Nashik Crime : नाशिकमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून चार लाखांना गंडा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Nashik Job Fraud : कनिष्ठ अभियंत्यापदी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल चार लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक: शासकीय विभागात कनिष्ठ अभियंत्यापदी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल चार लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.