
नाशिक : बिटको हॉस्पिटल इमारतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह होणार आहे. यासाठी शासनाने मंजुरी दिली. लवकरच याबद्दलची कार्यवाही केली जाणार आहे. शासनाने नाशिकसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले. मात्र, नवीन महाविद्यालयाची इमारत होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून बिटको हॉस्पिटल व हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय यातील इमारतींचा काही भाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी भाडेतत्त्वावर घेण्यास मान्यता दिली आहे.