Nashik March End Recovery: मार्च एंडिंगसाठी रात्रभर जागली सरकारी कार्यालये! मध्यरात्रीपर्यंत अधिकारी अन कर्मचाऱ्यांची धावपळ

Nashik News : ३१ मार्च हिशेबाच्या वर्षाची अखेर असल्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये मध्यरात्रीपर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती.
Government Officers
Government Officersesakal

नाशिक : नाशिकमधील जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांत मार्च एंडिंगची लगबग दिसून आली. शासकीय निधी वाटप, मंजुरी, महसूल उद्दिष्ट प्राप्ती, नूतनीकरण, वसुली या प्रमुख कामांचा निपटारा होण्यासाठी सरकारी कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी रात्रभर जागले.

३१ मार्च हिशेबाच्या वर्षाची अखेर असल्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये मध्यरात्रीपर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. सर्व हिशेब पूर्ण करण्याची घाई असल्याने सर्वच कार्यालयांतील कर्मचारी रविवारी (ता.३१) उशिरापर्यंत कामातच व्यस्त दिसले. (Nashik Government offices woke up night for March Ending marathi news)

विशेषत:जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, महावितरण, जीएसटी, इन्कम टॅक्स, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, राज्य उत्पादन शुल्क, बँका व पतसंस्था यांची आर्थिक व्यवहाराशी संबंधित वसुली व उद्दिष्ट प्राप्तीसाठी कामे सुरू होती.

शासकीय कार्यालयांतील वित्त आणि लेखा विभागात खास करून जास्त काम होते. संपूर्ण वर्षातील आर्थिक वर्षाचा ताळेबंद सादर करण्याची घाई असल्याने सर्वच कार्यालयांत हिशेबासाठीची लगबग रविवारी बघायला मिळाली. सर्वच कार्यालयांतून कर्मचाऱ्यांची देणी-घेणी, त्यांचे आर्थिक खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतनविषयक प्रश्न, साऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जात होते. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये फाइल्सच्या गराड्यात कर्मचारी काम करीत असल्याचे चित्र होते.

महावितरणमार्फत अगोदरच आवाहन करण्यात आले होते की, सुट्टीच्या दिवशीही वीज बिल स्वीकारले जाईल. त्यानुसार बिल स्वीकारण्यासाठी कलेक्शन सेंटर सुरू होती. जलसंपदा विभागात सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली पाठपुरावा, राज्य उत्पादन शुल्क विभागात महसूल उद्दिष्ट प्राप्ती व मद्य विक्री परवाना नूतनीकरण, राज्य कर म्हणजे जीएसटी विभागातही जीएसटी रिटर्न व संकलन या स्वरूपाची, जलसिंचन विभागात सिंचन व बिगर सिंचन प्रकल्प प्रकल्पांची पाणीपट्टी वसुली, बँका व पतसंस्थांमध्ये मार्च अखेर मंजुरी व वसुलीचा पाठपुरावा युद्ध पातळीवर रात्री उशिरापर्यंत सुरू होता. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे निवडणूक शाखेतही निवडणुकीसंबंधी कामे रविवार असतानाही सुरू होती. सर्व अहवाल ३१ मार्चपर्यंत पुढील कार्यालयाकडे सोपविणे बंधनकारक असल्याने कर्मचारी चांगलेच व्यस्त असल्याचे निदर्शनास आले.

Government Officers
March End Recovery : बँका, पतसंस्थांची कर्जवसुली जोरात; मार्च एंडमुळे वसुलीचा तगादा वाढल

विकेंड आनंदास मुरड

सर्व शासकीय, आर्थिक व्यवहार, जिल्हा कोशागार व परीक्षण या कार्यालयाच्या माध्यमातून होत असल्याने शुक्रवारी सुट्टी असताना सुद्धा त्या दिवसापासून तर रविवारी रात्रभर लेखा विभागातील वरिष्ठ कोशागार अधिकारी महेश बच्छाव, अप्पर कोशागार अधिकारी ज्योती गायकवाड, श्वेतांबरी भोसले, किशोर पवार व रमेश शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली शंभरहून अधिक कर्मचारी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी मार्च एंडिंगचे काम रात्री उशिरापर्यंत करत होते. गेल्या आठवड्यातील शुक्रवार, शनिवार, रविवारीही कार्यालये सुरू होती. त्यामुळे अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांना विकेंडचा आनंद आपल्या कुटुंबासमवेत घेता आला नाही.

Government Officers
Jalgaon News : पारोळ्यातील साचे बनविण्याच्या कलेला घरघर; जडे कुटुंबातील सातव्या पिढीची कला जिवंत ठेवण्यासाठी धडपड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com