Nashik News : शासकीय अंधशाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

Nashik News : शासकीय अंधशाळा येथे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता अंध विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली आहे.
admission
admissionesakal

Nashik News : शासकीय अंधशाळा येथे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता अंध विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली आहे, अशी माहिती नाशिक शासकीय अंधशाळेच्या प्रभारी अधीक्षक प्रभाकर घाटे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे. शासकीय अंधशाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वयोगट ६ ते १४ वर्षे असा असून विद्यार्थी फक्त अंध प्रवर्गातील असावा.

प्रवेशासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील विद्यार्थ्यांचे अंधत्व प्रमाणित वैद्यकीय दाखला असणे आवश्यक आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनामार्फत निवा़स, भोजन व इतर शैक्षणिक सोयी-सुविधा मोफत पुरविल्या जातात. शाळा प्रवेशासाठी विहित नमुन्यातील अर्ज अधीक्षक, शासकीय अंधशाळा.

नाशिक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आवार, नासर्डी पुलाजवळ, नाशिक- पुणे रोड कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत उपलब्ध होणार आहेत. (latest marathi news)

admission
Nashik Police Election Duty : EVM च्या ‘स्ट्राँग रुम’ भोवती पोलिसांची फुट पेट्रोलिंग! दरतासाला सुरक्षेचा आढावा

अधिक माहितीसाठी ०२५३-२२३७५६८ या दूरध्वनीवर अथवा अधीक्षक प्रभाकर घाटे भ्रमणध्वनी क्रमांक ९५१८७९४८१३, कलाशिक्षक एस. ए. पाळदे, कनिष्ठ लिपिक भ्रमणध्वनी क्रमांक ९६२३७८०७२५ यावर संपर्क साधावा.

admission
Nashik MSEDCL Tree Cutting : झाडांची छाटणी की कत्तल? वीजवितरण कंपनीवर कारवाईची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com