Nashik Graduate Constituency : सत्यजित तांबे यांचे पारडे अधिक जड! शिक्षकभारतीचा बिनशर्त पाठिंबा

MLA Kapil Patil speaking at the Shikshakar Bharati meeting held at Kalika Mandir Auditorium. Ashok Belsare, Satyajit Tambe, MLA Dr. Sudhir Tabe and officials.
MLA Kapil Patil speaking at the Shikshakar Bharati meeting held at Kalika Mandir Auditorium. Ashok Belsare, Satyajit Tambe, MLA Dr. Sudhir Tabe and officials.esakal

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत असलेले सत्यजित तांबे हे उच्चशिक्षित असून, त्यांच्याकडे संघटनकौशल्य आहे. त्याचबरोबर शिक्षक, शिक्षण, दलित, आदिवासी, वंचित व पुरोगामी विचारांशी ते जोडले गेल्याने याच तत्त्वावर त्यांना शिक्षकभारतीने बिनशर्त पाठिंबा दिल्याचे आमदार कपिल पाटील यांनी जाहीर केले.

शिक्षण व शिक्षकांवर काम करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वांत मोठी संघटना असलेल्या शिक्षकभरतीच्या पाठिंब्याने सत्यजित तांबे यांचे स्थान आज अधिक भक्कम झाले आहे. (Nashik Graduate Constituency Satyajeet Tambe position strong Unconditional support of Shikshak Bharti nashik news)

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी येत्या ३० जानेवारीला निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीमुळे पदवीधरांच्या आशा उंचावल्या आहेत.

त्याच अनुषंगाने आज शिक्षक लोकभारतीतर्फे कालिका मंदिरात कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. त्या वेळी आमदार पाटील यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, राज्यात शिक्षक लोकभारती ही शिक्षकांची संघटना सर्वांत मोठी आहे. संघटनेतर्फे सत्यजित तांबे यांना बिनशर्त पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यापूर्वी उपस्थित शिक्षक व पदवीधरांना पाठिंबा देण्यासंदर्भात विचारणा केल्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनीच हात वर करून समर्थन दिले.

सत्यजित तांबे यांना राजकारणात आणण्याची हीच योग्य वेळ असल्याचे आपण डॉ. सुधीर तांबे यांना वारंवार सांगितले. त्या अनुषंगाने सत्यजित यांना उमेदवारी दिल्याने त्या माध्यमातून तरुणांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सत्यजित हे उच्चशिक्षित, लेखक व उत्कृष्ट अनुवादक आहे. त्यांना संघटनेचा मोठा अनुभव असून, संघटनकौशल्य हा त्यांचा आवडीचा विषय आहे.

MLA Kapil Patil speaking at the Shikshakar Bharati meeting held at Kalika Mandir Auditorium. Ashok Belsare, Satyajit Tambe, MLA Dr. Sudhir Tabe and officials.
Nashik News: अंमलदारासाठी आयुक्तांचे निरीक्षकांना अल्टिमेटम; कर्मचाऱ्यांअभावी पथके होईना कार्यान्वित!

जिल्हा परिषदेतदेखील त्यांनी दहा वर्षे सदस्य म्हणून काम पाहिले. डॉ. सुधीर तांबे यांना पंधरा वर्षांपासून मी ओळखतो. त्यांच्या कुटुंबीयांचा राजकीय इतिहास बघितला तर डाव्या विचारांचा वारसा त्यांनी जोपासला आहे.

डॉ. तांबे यांनी परिषदेमध्ये फक्त पदवीधरांचेच प्रश्न मांडले असे नाही, तर शिक्षक, शिक्षण, दलित, आदिवासी व वंचितांचे प्रश्नदेखील त्यांनी मांडले अन् तेवढ्याच ताकदीने सोडविले. पुरोगामी विचार हा तांबे कुटुंबियांचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आम्ही तांबे यांच्यासोबत असल्याचे पाटील यांनी जाहीर केले.

तिथे काँग्रेसने पळ का काढला?

उमेदवारीवरून तांबे कुटुंबीयांची चुकीची प्रतिमा निर्माण केली जात आहे. सत्यजित यांच्यावर अन्याय झालाय, ही बाब लपविली जात आहे. ज्या आघाडीला आपण समर्थन दिले त्यांच्याकडून अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. नागपूर मतदारसंघात शिक्षकभारतीने समर्थन मागितले. मात्र निर्णय घेताना वेळकाढूपणा झाला.

काँग्रेसने निवडणुकीतून पळ का काढला? हे समजत नाही. सत्यजित व डॉ. सुधीर तांबे यांची फसवणूक करण्यात आली. स्वार्थासाठी हक्काची जागा गमावल्याचा आरोप पाटील यांनी केला. शिक्षकभारतीचे प्रदेशाध्यक्ष अशोक बेलसरे, संघटनेचे पदाधिकारी अर्जुन कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

MLA Kapil Patil speaking at the Shikshakar Bharati meeting held at Kalika Mandir Auditorium. Ashok Belsare, Satyajit Tambe, MLA Dr. Sudhir Tabe and officials.
Winter Healthy Foods: हिवाळ्यात चिक्की खाणे ठरते आरोग्यादायी

पाठिंबा देणाऱ्यांचे स्वागत

सत्यजित तांबे यांना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पाठिंबा देणाऱ्यांचे शिक्षकभारतीतर्फे स्वागत करू, असे स्पष्टीकरण देताना भारतीय जनता पक्षाचे नाव घेण्याचे आमदार पाटील यांनी टाळले. डॉ. सुधीर तांबे यांचा इतिहास तपासल्यास पुरोगामी विचारांचा वारसा त्यांनी पुढे नेल्याचे दिसून येईल. त्यांनी कोणाशी बेईमानी केली नाही, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.

पाठिंब्याने लढण्याचे बळ : तांबे

विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून तांबे परिवाराला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये शिक्षकभारतीने दिलेला पाठिंबा आम्ही विसरणार नाही. या नैतिक बळामुळे लढण्याची ताकद आली आहे. जे काय घडलं किंवा चालले यासंदर्भात आपण योग्य वेळी बोलू.

पंधरा वर्षांत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले. त्यांनी घेतलेली भूमिका, केलेली कामे, त्यांचा स्वभाव आपण पूर्णपणे आत्मसात करू, असा शब्द त्यांनी दिला. शिक्षण क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे. शिक्षक संस्थाचालक व विद्यार्थ्यांचे प्रश्न निवडून आल्यावर सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करताना मागील पंधरा वर्षांत केलेली कामे मांडली. माझ्या कामांचा व विचारांचा वारसा सत्यजित यांच्या माध्यमातून पुढे नेला जाईल, असे त्यांनी आश्वासित केले.

MLA Kapil Patil speaking at the Shikshakar Bharati meeting held at Kalika Mandir Auditorium. Ashok Belsare, Satyajit Tambe, MLA Dr. Sudhir Tabe and officials.
Nashik News | वायुप्रदुषण नियंत्रणासाठी हवी नागरिकांची साथ : NMC आयुक्‍त डॉ.पुलकुंडवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com