Nashik News: अंमलदारासाठी आयुक्तांचे निरीक्षकांना अल्टिमेटम; कर्मचाऱ्यांअभावी पथके होईना कार्यान्वित!

Nashik Police Commissioner ankush shinde latest news
Nashik Police Commissioner ankush shinde latest newsesakal

नाशिक : शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांनी नव्याने चार पथके कार्यान्वित केली आहेत. परंतु, या पथकांमध्ये नेमलेले पोलिस अंमलदारांना मूळ ठिकाणावरून मुक्त करण्यात आलेले नाही.

सदर बाब पोलिस आयुक्तांच्या लक्षात येताच, त्यांनी थेट पोलिस निरीक्षकांनाच अल्टिमेटम देत, नेमलेल्या अंमलदारांना तत्काळ कार्यमुक्त करा अन्यथा तुमची बदली नियंत्रण कक्षात करावी लागेल अशी तंबीच दिली. आयुक्तांच्या या तंबीमुळे अंमलदारांना कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. (Nashik police Commissioners ultimatum to inspectors for enforcement nashik news

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नव्याने चार पथके स्थापन केली आहेत. यात खंडणी, दरोडा व शस्त्रे, अमली पदार्थ आणि गुंडाविरोधी या चार पथकांचा समावेश आहे. ही चारही पथके नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून कार्यान्वित होणार होती.

त्यासाठी निरीक्षकांसह सहायक निरीक्षक आणि अंमलदारांची नियुक्ती केली आहे. त्यासंदर्भात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांसह अंमलदारांना त्यांच्या बदलीचे आदेशही दिले आहेत. परंतु, बदलीचे आदेश मिळूनही संबंधित अंमलदारांना त्यांच्या प्रमुखांकडून कार्यमुक्त केले जात नव्हते.

सदर बाब पोलिस आयुक्त शिंदे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले. त्यासाठी आयुक्तांनीच थेट निरीक्षकांना कार्यमुक्त होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या अंमलदारांना कार्यमुक्त करण्यासाठी अल्टिमेटमच दिला.

विशेष पथकासाठी बदली केलेल्या अंमलदारांना तत्काळ ठाण्यामधून कार्यमुक्त करा, अन्यथा तुमची बदली आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात करावी लागेल, अशा भाषेत तंबी दिली.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

Nashik Police Commissioner ankush shinde latest news
Dr. Amol Kolhe | शिवपुत्र संभाजी महानाट्याचा ‘तनिष्कां’नी करावा प्रचार- प्रसार : अमोल कोल्हे

पोलिस आयुक्तांकडूनच अल्टिमेटम आल्याने संबंधित निरीक्षकांना कार्यमुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या अंमलदाराच्या बदलीच्या पूर्ततेची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच आयुक्तांच्या चारही पथकांमध्ये अंमलदार रुजू होऊन प्रभावी पोलिसिंग शहरात राबविली जाण्याची शक्यता आहे. या पथकामुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसू शकेल.

अशी आहेत पथके अन् अधिकारी

पथक.... नेमलेले अधिकारी...... नेमलेले कर्मचारी

अमली पदार्थविरोधी पथक : १ निरीक्षक, १ सहायक निरीक्षक : १७ कर्मचारी
दरोडा व शस्त्रविरोधी पथक : १ सहायक निरीक्षक : १४
गुंडा प्रतिबंधक पथक : १ सहायक निरीक्षक : १३
खंडणीविरोधी पथक : १ सहायक निरीक्षक : १३

Nashik Police Commissioner ankush shinde latest news
Nashik News : नाशिक, निफाड, सिन्नरमध्ये आवर्तनावेळी वीज खंडीत होणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com