
नाशिक : मनमाड येथील धान्य गुदामातून धुळे, नंदुरबारसह नाशिक जिल्ह्याला धान्य पुरवठा केला जातो. एकट्या नाशिक जिल्ह्याला या दोन्ही जिल्ह्यांपेक्षा दुप्पट धान्य लागते. पण, वेळेअभावी धान्य गुदामातून उचलणे शक्य होत नसल्याने तीन महिन्यांपासून धान्य पुरवठा विस्कळित झाला आहे. नोव्हेंबरमध्ये अवघे २२ टक्के, तर डिसेंबरमध्ये केवळ नऊ टक्केच धान्य नाशिककरांना उचलता आले. परिणामी, नोव्हेंबरचे ७८ टक्के व डिसेंबरचे ९१ टक्के धान्य एफसीआयच्या गुदामातून पुरवठा विभागाकडे आलेच नाही.