नाशिक: जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीत ग्रामविकास विभागाने यापूर्वीचे आरक्षण रद्द ठरवत आमूलाग्र बदल घडविला आहे. नव्याने होणाऱ्या आरक्षण सोडतीत गट व गणातील लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आरक्षण निघेल. यामुळे चक्रिय आरक्षणाची अडचण दूर होणार असून, ग्रामीण नेतृत्वाला संधी देण्यासाठी हा निर्णय पोषक ठरणार आहे.