Nashik News : नासर्डी पुलावर संरक्षक कठड्यास लागेना मुहूर्त

Nashik : नासर्डी पुलावरील निकृष्ट दर्जाचे संरक्षक कठडे असल्यामुळे वाहन थेट नदीमध्ये कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
Temporary barricading of sheets can lead to accidents at any time
Temporary barricading of sheets can lead to accidents at any timeesakal

Nashik News : नासर्डी पुलावरील निकृष्ट दर्जाचे संरक्षक कठडे असल्यामुळे वाहन थेट नदीमध्ये कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच एका बाजूस तर कठडेच नाही. तेथे प्रशासनाने लोखंडी पत्रे तात्पुरते उभे करून बॅरिकेटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन दिवसांपूर्वीच द्वारका सर्कलकडून नाशिक रोडकडे जाताना कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे नासर्डी पुलावर पलटी झाला. (Nashik Guarding wall on Nasardi bridge is not safe marathi News )

कंटेनरचा काही भाग सिमेंटच्या संरक्षक कठड्यावर आदळला. त्यामुळे कठड्यास तडे गेले. त्याला लागून असलेला लोखंडी पाइपही तुटला. कंटेनर रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्यामुळे कंटेनर पूर्णपणे कठड्यावर आदळला नाही, जर असे घडले असते तर कठडे तोडून कंटेनर थेट नदीत कोसळला असता. तसेच नाशिक रोडहून द्वारकाकडे जाताना उजव्या हाताला तर बरेच दिवस संरक्षण कठडेच नव्हते.  (latest marathi news)

Temporary barricading of sheets can lead to accidents at any time
Nashik News : मेकॅनिकल गेटवरून ‘स्मार्टसिटी’ ची कोंडी; माजी अभियंत्यांना विभागीय आयुक्तांसमोर हजर राहण्याची वेळ

नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर पत्रे लावून एक जुजबी स्वरूपाच बॅरिकेटिंग दाखवण्याचा प्रयत्न केला. कंटेनरचा थोडा धक्का लागला तर लोखंडी पाइप व सिमेंटच्या कठड्याला तडे जात असतील तर साधे पत्रे लावलेला कठड्यांचे काय होणार याचा अंदाज येईल. म्हणूनच दोन्हीही बाजूला सिमेंटचे पक्क्या स्वरूपाचे संरक्षक कठडे लावणे आवश्यक आहे.

जेणेकरून अपघात टाळता येईल. द्वारका ते दत्तमंदिर चौक या चार किलोमीटरमध्ये कायम दुरुस्तीचे काम सुरू असते. मात्र नासर्डी पुलावरील वाहने वाहनांना अपघात घडू नये ते नदीमध्ये कोसळू नये यासाठी कुठल्याही उपाययोजना केली गेली नाही. अनेक वर्षांपासून संरक्षित कठडे सिमेंटचे असले तरी जीर्ण होत आहे. यासाठी त्वरित नव्या स्वरूपाची संरक्षण कठडे बसविण्याची आवश्यकता आहे.

Temporary barricading of sheets can lead to accidents at any time
Nashik News : गांधीनगर क्लब परिसरात घाणीचे साम्राज्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com