Gurumauli Annasaheb More : यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Nashik News : आत्मविश्वास माणसाची फार मोठी शक्ती आहे. यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे.
Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb Moreesakal

Nashik News : आत्मविश्वास माणसाची फार मोठी शक्ती आहे. यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे. आत्मविश्वास म्हणजे यशाची खात्री, मी हे करणार, त्यात यश मिळवणार, मला हे नक्की चांगले जमेल, मी अवघडसुद्धा सहज सोपे बनवीन, अशा प्रकारची सक्रिय करणारी इच्छाशक्ती बळकट करणे म्हणजे आत्मविश्वास होय. (Gurumauli Annasaheb More statements Confidence is essential for success)

असे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी प्रधान केंद्रात रविवारी (ता. ७) सांगितले. दिंडोरीप्रणीत प्रधान अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात रविवारी गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांशी संवाद साधला. गुरुमाउली म्हणाले, की परीक्षेसाठी आत्मविश्वास असायला हवा. पण तो तयारीने, अभ्यासाने दृढ बनवता येतो.

आपले मन आपले सतत परीक्षण, मूल्यांकन करीत असते. सर्वांना भ्रमात ठेवता येईल, पण मनाला नाही. तुम्ही आपल्या चुका, उणिवा झाकण्यासाठी समर्थने तयार कराल, पण मनाजवळ या समर्थनांना जागा नाही. मन म्हणजे स्वतःला ओळखण्याचा स्वच्छ आरसा, म्हणून मनाशी प्रामाणिक असणे हेही माणसाचे व्यक्तिमत्त्व खंबीर असण्याचे एक कारण आहे.

मनाच्या चांगल्या इच्छा कृतीत उतरवणे, सतत आत्मपरीक्षण करून दोष, चुका सुधारणे, यातून व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. खरेपणा, प्रामाणिकता माणसाला निर्भय बनवते. निर्भय माणूस स्थिर व एकाग्र मनाने काम करू शकतो. थोडक्यात, विद्यार्थ्यांनी सतत ‘विद्यार्थी’ राहून विद्या प्राप्तीचे कार्य वेळच्या वेळी, लक्ष देऊन, अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची वृत्ती बनवली तर त्यातून आत्मविश्वास व आत्मविश्वासातून यश नक्कीच मिळेल. (latest marathi news)

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : ‘वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीड पराई जाने रे।’ : गुरुमाउली आण्णासाहेब मोर

परीक्षेत यश मिळविण्यासाठी आपण गेले वर्षभर प्रयत्न करतो. मग परीक्षा अवघड का जावी? तिची भीती का वाटावी? याचे खरे कारण म्हणजे आपण आपले महत्त्वाचे, अग्रक्रमाचे कार्य सोडून काळ घालवतो. नव्हे काळाचा अपव्यय करतो. आपण शिकवण्याचा फक्त देखावा करतो का? मनातून कंटाळा, उबग, नीरसता निर्माण झाली आहे का? असे का होते आहे?

आपण मागे जातो आहोत का? या प्रश्नांची खरी उत्तरे शोधा. त्या बाबतीत पालकांशी, शिक्षकांशी चर्चा करा. कारण तुमची प्रगती ही उद्याच्या समाजाची, राष्ट्राची प्रगती आहे. पालकांनाही आपल्या पाल्याविषयी काही प्रश्न/समस्या असतील, तर आपण तज्ज्ञांशी खुला संवाद साधावा. पाल्याचा हा शैक्षणिक काळ त्याचे व्यक्तिमत्त्व घडवणारा, त्याच्या भविष्याची पायाभरणी करणारा म्हणून महत्त्वाचा काळ आहे, असे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सांगितले.

सुरवातीला सकाळी गुरुमाउलींच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची महापूजा झाली. त्यानंतर गुरुमाउलींनी सेवेकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम झाला. स्वामी सेवेनंतर दुपारी गुरुमाउलींनी उपस्थित सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. सायंकाळी महाआरती झाली. या वेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी आबासाहेब मोरे व सेवेकरी उपस्थित होते.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : ज्ञानाचे पवित्र महाउज्ज्वल लावण्य म्हणजे समस्त दृष्टी : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com