Gurumauli Annasaheb More : सद्‌गुरू शिष्याला सर्व सामर्थ्यांनी युक्त तेजस्वी, ज्ञानी बनवतात

Nashik News : समुद्राच्या भरतीला पूर्ण चंद्रबिंबाची आस जन्मत: जडावी, तसा गुरूचा ध्यास मनी जडावा, म्हणजे सद्गुरू शिष्याला सर्व सामर्थ्यांनी युक्त असे तेजस्वी, ज्ञानी बनवतात.
Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb Moreesakal

Nashik News : हंसाला मोत्याची आस, कमळाला विकसित होण्यासाठी सूर्योदयाची आस, चातकाला स्वाती नक्षत्राच्या थेंबाची आस, हिरव्या पात्याला सूर्यकिरणांच्या प्राशनाची आस, समुद्राच्या भरतीला पूर्ण चंद्रबिंबाची आस जन्मत: जडावी, तसा गुरूचा ध्यास मनी जडावा, म्हणजे सद्गुरू शिष्याला सर्व सामर्थ्यांनी युक्त असे तेजस्वी, ज्ञानी बनवतात.

या अर्थाने आपले शिष्यत्व विवेकाच्या आत्मप्रकाशात पारखून घेण्याचा सुदिन म्हणजे गुरुपौर्णिमा होय, असे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी प्रधान केंद्रात रविवारी (ता. २) सांगितले. दिंडोरीप्रणीत प्रधान अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात रविवारी गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांशी संवाद साधला.

गुरुमाउली म्हणाले, की ‘तुझे आहे तुजपाशी। परी तू जागा चुकलासी॥’ अशा चुकलेल्या माणसांना सुधारण्याचे, मूळ स्वरूपात आणण्याचे अलौकिक कार्य लौकिक जगात राहून सद्गुरू करतात. मोरेदादा या अर्थाने नेहमी म्हणत असत की- ‘गुरू से बडा गुरू का ध्यास’, ध्यासातून सद्गुरू व ध्यानातून गुरुतत्त्व मिळते.

अध्यात्म शास्त्राच्या महानिधीचा दाता सद्गुरू बोधाने अशा आध्यात्मिक मनोभूमिकेत घेऊन जातात की सद्गुरू त्या ठिकाणी चिन्मय महेश्वराच्या आदिबीजाच्या स्वरूपात अनुभूत होतात. या अनुभूतीची शब्दयात्रा या अनुभवगम्य भावनेची तीर्थयात्रा म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’ किंवा तुकारामांची अभंगगाथा होय. या अनुभूतीला उमललेल्या चैतन्याक्षरांची बरसात म्हणजे एकनाथांचे काव्य किंवा दासबोध होय. (latest marathi news)

Gurumauli Annasaheb More
Nashik ZP News : ग्रामसेवक युनियन असहकार आंदोलनावर ठाम; आंदोलनाबाबत संघटनांमध्ये फूट

अनंतकोटी ब्रह्मांडाचे नायक यतिवर्य श्री स्वामी समर्थ महाराज गुरुतत्त्वाचे पूर्ण तेजोमान निखळ, विशुद्ध ज्ञानस्वरूप होय. ते ब्रह्मानंदाचे उगमस्थान व सर्व सुखशांतीचे आश्रयस्थान आहेत. गुरुपौर्णिमेला श्री स्वामी महाराजांना आपले गुरूपद घेण्याची सविनय व मनोभावे प्रार्थना करावी. श्री स्वामी महाराज अनंत व सर्वसाक्षी आहेत.

ते भक्तवत्सल, भक्ताभिमानी आहेत. त्यांना केलेली प्रार्थना आपल्याला आत्मबळ व प्रचीती देते. त्यांच्या भक्तीचा परिसस्पर्श लाभून हे दु:खी जीवन आनंदाचे निधान व्हावे, यासाठी सर्व संशय, भ्रम, अहंकार बाजूला ठेवून एक क्षणभर तरी भगवंताच्या चरणी मन समर्पित करावे.

सुरवातीला सकाळी गुरुमाउलींच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची महापूजा झाली. त्यानंतर गुरुमाउलींनी सेवेकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम झाला. स्वामी सेवेनंतर दुपारी गुरुमाउलींनी उपस्थित सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. सायंकाळी महाआरती झाली. या वेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी आबासाहेब मोरे व सेवेकरी उपस्थित होते.

Gurumauli Annasaheb More
Nashik Pre-Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com