
नाशिक : शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी आदिवासी विकास विभागाने ‘गुरुशाला’ हा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत राज्यातील ४९७ शासकीय आश्रमशाळांतील दोन लाख विद्यार्थ्यांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी त्याचा उपयोग होणार आहे. आदिवासी विकास विभागातर्फे राज्यात ४९७ शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांमध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते.