
सटाणा : येथील मविप्र संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना.म.सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातील हर्षाली रौंदळ (प्रथम वर्ष, एम.एस्सी.) या विद्यार्थिनीने तयार केलेल्या 'महिला सुरक्षा ॲपची' उत्कृष्ट संशोधन प्रकल्प म्हणून विद्यापीठ स्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आविष्कार, अन्वेषण, इनोवेशन परिषद यासारखे संशोधनपर उपक्रम राबविले जातात.