Nashik Monsoon News : राज्‍यभर मुसळधार, नाशिकमध्ये रिमझिम; पावसाने दिली ओढ

Nashik News : एकीकडे राज्‍यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना नाशिकमध्ये मात्र अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस बरसलेला नाही. त्‍यामुळे रिमझिम पावसावर समाधान मानावे लागत आहे.
Nashik Monsoon News
Nashik Monsoon News esakal

नाशिक : एकीकडे राज्‍यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना नाशिकमध्ये मात्र अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस बरसलेला नाही. त्‍यामुळे रिमझिम पावसावर समाधान मानावे लागत आहे. पावसाने ओढ दिलेली असून, जुलै महिना निम्‍मा संपायला आलेला असताना शहर-जिल्हावासीयांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. (Nashik has not yet received satisfactory rainfall)

यंदा कधी नव्‍हे ते तप्त उन्‍हाळ्याचे चटके नाशिककरांना सहन करावे लागले होते. पारा चाळिशीपार पोचलेला असताना नागरिकांना पावसाच्‍या सरींची ओढ लागलेली होती. अशात पावसाळ्याला सुरवात होण्यापूर्वी मे महिन्‍यात वळिवाच्‍या पावसाने शहर परिसरात हजेरी लावली होती. यामुळे काही प्रमाणात पाऱ्यामध्ये घसरण झाली.

परंतु ऐन जून महिन्‍यात अपेक्षेप्रमाणे पाऊस बरसला नाही. संपूर्ण जून महिना उलटूनही मुसळधार न झाल्‍याने नाशिककरांच्या चिंतेत भर पडली होती. हवामान खात्‍याने वर्तविलेल्‍या अंदाजानुसार जुलैमध्ये तरी जोरदार पाऊस पडेल, अशी आशा नागरिकांना होती. परंतु राज्‍यातील विविध भागांमध्ये मुसळधार सुरू असताना नाशिकमध्ये केवळ रिमझिम पावसाची हजेरी आहे.

जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍याच दिवशी १ तारखेला दिवसभर पाऊस सुरू होता. ४० मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली होती. मात्र गेल्‍या आठवड्याभरापासून दैनंदिन पावसाची आकडेवारी एक आकडी राहात आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिले तरी तुरळक स्वरूपात पाऊस बरसत असल्‍याने आगामी काळात नागरिकांच्‍या चिंतेत आणखी भर पडणार असल्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. (latest marathi news)

Nashik Monsoon News
Nashik Railway : सलग दुसऱ्या दिवशी ‘पंचवटी’सह अनेक गाड्या रद्द! नाशिकच्या प्रवाशांचे हाल

धरण क्षेत्रही कोरडेच

शहरी भागात पावसाने ओढ दिली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व इतर धरणांच्‍या क्षेत्रातही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्‍यामुळे धरणांतील पाणीसाठ्याची पातळी खालावत असून, पाणीटंचाईचे ढग दाटायला लागले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्‍यास पाणीकपातीच्‍या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागू शकते.

जूनमधील पाऊस - ११३ मिलिमीटर

जुलैमधील पाऊस (८ जुलैपर्यंत) - ८५ मिलिमीटर

Nashik Monsoon News
Nashik News : आयुक्तालयातील प्रभारींवर ‘खांदेपालटा’ची टांगती तलवार; सहायक आयुक्तांमध्ये फेरबदलाची चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com