
नाशिक : सध्या हिवाळा सुरू असून शारीरिक तंदुरुस्ती जपण्यासाठी हा काळ योग्य असल्याने ज्येष्ठांसह तरुणाईने चालण्या- फिरण्याबरोबरच ट्रेकिंगला प्राधान्य दिले आहे. म्हसरूळ शिवारातील निसर्गरम्य चामरलेणीला पसंती दिली आहे. येथे भल्या पहाटेपासून व्यायामासाठी व ट्रेकिंगसाठी मोठी गर्दी उसळत आहे. व्यायामप्रेमींसाठी चामरलेणी डोंगर व परिसर ‘फिटनेस डेस्टिनेशन’ ठरला आहे. येथील वनराईसह शुद्ध हवेची अनेकांना भुरळ पडते. त्यासाठी अनेकजण दूरवरून या ठिकाणी येतात.