Nashik News : दुष्काळी सिन्नर तालुक्यात ‘हेल्दी प्रगती’! दुध प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांना दिलासा

Nashik : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या सिन्नर तालुक्यातील दापूर येथील ‘हेल्दी फूड्स’ या स्थानिक उद्योगाने परिसरातील शेतकऱ्यांना शाश्‍वत व सोयीचे मार्केट उपलब्ध करून दिले आहे.
A healthy foods project set up at Dapur in the taluka. In the second photo, Prashant Bhosle, Brahma Chatte, Santosh Shinde, Anil Farkande etc. while getting information about the project.
A healthy foods project set up at Dapur in the taluka. In the second photo, Prashant Bhosle, Brahma Chatte, Santosh Shinde, Anil Farkande etc. while getting information about the project.esakal

Nashik News : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या सिन्नर तालुक्यातील दापूर येथील ‘हेल्दी फूड्स’ या स्थानिक उद्योगाने परिसरातील शेतकऱ्यांना शाश्‍वत व सोयीचे मार्केट उपलब्ध करून दिले आहे. बाजारभावानुसार दर आणि निर्देशित वेळेतच दुधाचे पैसे उत्पादकांना मिळू लागल्याने येथील दुग्ध व्यवसायास चालना मिळत आहे. एका अर्थाने हेल्दी फूड्सने शेतकऱ्यांना आत्मनिर्भर केले आहे. (Healthy progress in drought stricken Sinnar taluka )

सिन्नर तालुक्यातील दापूर येथील शेतकरी कुटुंबातील कुणाल आव्हाड यांनी स्वबळावर साकारलेला प्रकल्प सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे कुणाल यांचे प्राथमिक शिक्षण दापूर जिल्हा परिषद शाळा, तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले. २०१२ मध्ये बारावी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर कला शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी २०१६ साली पुणे गाठले.

राजकीय क्षेत्रात करिअर करण्याच्या हेतूने पुण्यातील एसपी कॉलेजमधून ‘पॉलिटिकल सायन्स’ या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केले. परंतु, नोकरीची संधी न मिळाल्याने २०१८ साली एमआयटीमध्ये ‘पॉलिटिकल लीडरशिप ॲण्ड गव्हर्नमेंट’ या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्यातूनच पुढे महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांकडे नोकरी केली. व्यवसायाच्या कारणाने अपरिहार्यतेने नोकरी सोडली. कोरोनाकाळात वडील आणि त्यांच्या तीन मित्रांनी सुरु केलेल्या दुग्ध क्षेत्रातील व्यवसायात मदत केली.(latest marathi news)

A healthy foods project set up at Dapur in the taluka. In the second photo, Prashant Bhosle, Brahma Chatte, Santosh Shinde, Anil Farkande etc. while getting information about the project.
Nashik News : नाशिक शहरातील 155 मांस विक्रेत्यावर कारवाई! भरारी पथकांच्या माध्यमातून तपासणी मोहीम

सविचारी मित्रांची जिद्द फळास

२०२० साली वडील संदीप आव्हाड व त्यांचे मित्र शरद आव्हाड, संजय सांगळे, मनोज सांगळे या समविचारी मित्रांनी मिळून ‘हेल्दी फुड्स’ नावाने डेअरी प्रोजेक्ट सुरू केला. दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक आणि शाश्‍वत आहे. या व्यवसायातून शेतकऱ्याला रोख पैसा मिळतो.

ज्याचा उपयोग शेतीसाठी भांडवल म्हणून केला जातो. त्याचप्रमाणे दुग्ध संकलन केंद्र व दुग्धजन्य पदार्थांची खरेदी-विक्री यातून तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध होईल, या हेतूने हेल्दी फूड्स १.५ लाख लिटर क्षमतेचा दूध प्रक्रिया व त्यापासून निर्माण होणाऱ्या उपपदार्थांचा डेअरी प्लांट दापूर येथे सुरु झाला अन्‌ सविचारी मित्रांची जिद्द फळास आली. हेल्दी फुड्सचे सध्या मिल्क, देसी घी, दही, ताक, खवा, पनीर, श्रीखंड, आम्रखंड ही बायप्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

''व्यवसाय करताना स्थानिक युवक अन् शेतकरी यांच्या गरजांची दखल घेत दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करत यश येत गेले. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेकांना संधी मिळाल्याचे समाधान काही औरच आहे.''- कुणाल आव्हाड, व्यावसायिक, दापूर

''दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या सिन्नरच्या ग्रामीण भागात उद्योग निर्माण करीत चांगल्या पद्धतीने चालू ठेवणे नवीन उद्योजकांसाठी प्रेरणादायीच आहे.''- प्रशांत भोसले, उद्योजक, पुणे

A healthy foods project set up at Dapur in the taluka. In the second photo, Prashant Bhosle, Brahma Chatte, Santosh Shinde, Anil Farkande etc. while getting information about the project.
Nashik News : विशेष मोहिमेंतर्गत बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा; इ-चलानद्वारे दंड आकारणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com