Nashik : महापालिका शाळा परिसरात कचऱ्याचे ढीग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik news

Nashik : महापालिका शाळा परिसरात कचऱ्याचे ढीग

जुने नाशिक : बडी दर्गा महापालिका शाळा परिसरात असलेल्या कचराकुंडीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. तसेच जुने नाशिक परिसरातील विविध भागात असलेल्या कचराकुंडीमुळे रहिवाशांनादेखील आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कायमस्वरूपी येथील कचराकुंडी हटविण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : 2 कारमधून अवैध मद्याची वाहतूक

पिंझरघाट येथील शाळा भिंतीस लागून गेल्या अनेक वर्षापासून मोठी कचराकुंडी आहे. परिसरासह विविध भागातील रहिवासी याठिकाणी कचरा टाकत आहे. विविध प्रकारचा कचरा असल्याने उंदीर, घुशींचे प्रमाण वाढले आहे. मोठ्या प्रमाणावर दिवसभर कचरा पडून असल्याने दुर्गंधी, डासांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. रहिवासीदेखील आजारी पडत आहे. सकाळच्या सुमारास स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचरा उचलून नेल्यास त्यांची पाठ फिरत नाही, तोच पुन्हा नागरिक मोठ्या प्रमाणावर कचरा आणून टाकत असतात.

हेही वाचा: Nashik : संगणकाच्या युगात रोजनिशीचे महत्त्व कायम

त्याचप्रमाणे घास बाजार येथील शाळेसमोरही मोठी कचराकुंडी आहे. फुले मार्केटमधून निघणारा विविध प्रकारचा कचरा तसेच परिसरातील अन्य व्यावसायिकांचा कचरादेखील याठिकाणी टाकला जातो. यामुळे शाळेसह परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत असते. त्यास लागून असलेल्या पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनादेखील कचराकुंडीचा आणि दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा: Nashik Crime News : बोनसची मागणी केल्याने सफाई कामगारांना मारहाण

अशाप्रकारे खडकाळी सिग्नल, फूल बाजारातील शौचालय समोर तसेच जुने नाशिक परिसरातील अन्य विविध भागात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर कचराकुंडीमुळे शहराची स्वच्छता धोक्यात आली आहे. इतकेच नाही तर रस्त्यावर कचरा फेकला जातो. वेळोवेळी त्यांची स्वच्छता न झाल्याने तो कचरा रस्त्यावरील ड्रेनेजच्या जाळ्यामध्ये अडकला जातो. त्यामुळे जाळी झाकली जाते. पावसाचे पाणी जाळीमधून ड्रेनेजमध्ये न जाता रस्त्यावर वाहत जाऊन ठिकठिकाणी पाणी साचते. परिसरास नदीचे स्वरूप येत असते. जोरदार पाऊस असल्यास रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यवसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान होत असते.

हेही वाचा: Nashik : तब्बल 11 वर्षानंतर निवृत्त मुख्याध्यापिकेला न्याय!

दहिपूल, सराफ बाजार परिसरात पाणी साचण्याचे उत्तम उदाहरण आहे. याठिकाणी पाणी साचल्यास नागरिकांनी कर्मचारी चेंबरवरील जाळींची स्वच्छता करतात. काही चेंबरवरील ढापे उघडे केले जातात. स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक ओळख होण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.