नाशिक: दोन दिवसांपासून जिल्ह्यात हजेरी लावणाऱ्या पावसाचा जोर सोमवारी (ता. १८) वाढला. ग्रामीण भागात ठिकठिकाणी दिवसभरात मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. हवामान विभागाने जिल्ह्याच्या घाटमाथा परिसराला मंगळवारी (ता. १९) रेड, तर बुधवारी (ता. २०) ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागरिकांनी सावधानता बाळगावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.