Nashik News : मदतीचा एक हात अन्‌ महिलांची झेप उद्योजकतेकडे; विकासापासून दुरावलेल्या गावांची होतेय प्रगती

Nashik : दिंडोरी तालुक्यातील अवनखेड, करंजवण, दहिवी, उमराळे खुर्द व पिंपळगाव धुम अशी गावं आहेत जिथे जीवनाश्यक वस्तू आणण्यासाठी वणी, दिंडोरी गाठावे लागते.
Self-help group women preparing letters at Entrepreneur Center.
Self-help group women preparing letters at Entrepreneur Center.esakal

Nashik News : दिंडोरी तालुक्यातील अवनखेड, करंजवण, दहिवी, उमराळे खुर्द व पिंपळगाव धुम अशी गावं आहेत जिथे जीवनाश्यक वस्तू आणण्यासाठी वणी, दिंडोरी गाठावे लागते. विकासापासून दुरावलेल्या गावांमध्ये इकोसॅन सर्व्हिसेस फाउंडेशन व पर्नोर्ड रिकार्ड इंडिया फाउंडेशनने या महिलांची गरज ओळखून त्यांना जीवनावश्यक वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले. त्यांना व्यवसायाचा मार्ग दाखवत गावागावात महिला विकास केंद्र उभारले. ( helping hand and women leap towards entrepreneurship )

कंपनीने दिलेल्या या मदतीच्या हातामुळे ग्रामीण भागातून अनेक महिला यशस्वी उद्योजक बनत आहे. महिला शेतात मोलमजुरी, शिवणकाम करून चार पैसे मिळविण्यासाठी राबतात पण त्यातून हाती काही पडत नाही. कष्ट करण्याची तयारी पण काय करावे, कुठून आणि कसे सुरू करावे0 याचा अंदाज नसल्याने परिस्थिती जैसे थे होती. महिलांची हीच गरज ओळखून ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षण देवून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने इकोसॅन सर्व्हिसेस फाउंडेशन व पर्नोर्ड रिकार्ड इंडिया फाऊंडेशनने येथील महिला बचत गटांना जीवनावश्यक वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले.

त्यानंतर कच्चा माल, यंत्रणा उपलब्ध करून दिली. आता या महिला सॅनिटरी पॅड, अगरबत्ती, ऑर्गेनिक साबण, द्रोण पत्रावळ बनविणे यासारखे विविध छोटे-छोटे व्यवसाय बचत गटाच्या माध्यमातून सुरु केले आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना त्यातून रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेक महिलांना कंपनीने द्रोण, पत्रावळी, प्लेट बनविण्याचे मशीन देवून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

त्यानंतर छोट्या ऑर्डर घ्यायला सुरवात केली. नंतर जशी मागणी वाढायला लागली तशा महिला जोमाने कामाला लागल्या. यातून कुटुंबाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती सुधारली असून महिला अधिक सक्षम झाल्या आहेत. यासाठी महिलांना फाउंडेशनच्या वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक आदित्य भेडसगावकर, सानिका घळसासी तसेच तृप्ती पाटील, भाग्यश्री सोमवंशी यांचे मार्गदर्शन मिळते. (latest amarthi news)

Self-help group women preparing letters at Entrepreneur Center.
Nashik News : सटाणा शहर वळण रस्ता की उड्डाणपूल? दुतर्फा अतिक्रमणामुळे मार्ग बनला मृत्यूचा सापळा

यांना गवसला प्रगतीचा मार्ग

दिंडोरी तालुक्यातील उन्नती महिला उद्योग समूह (अवनखेड), संकल्पपूर्ती महिला उद्योग समूह (करंजवण), कावेरी स्वयं सहाय्यता समूह (दहिवी), शिवमल्हार स्वयं सहाय्यता समूह (उमराळे खुर्द), धनलक्ष्मी सहाय्यता समूह (पिंपळगाव धुम) या प्रत्येक बचत गटात दहा-बारा महिला यांनी प्रशिक्षण घेऊन आपला व्यवसाय सुरु केला आहे. गावात लग्नकार्य, धार्मिक कार्यक्रम असला की महिलांना पेपर प्लेट्स बनविण्याची ऑर्डर मिळते.

''शिक्षण दहावी झाले आहे याआधी शेतात मजुरी करायचे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शेतात राबून फार पैसे मिळायचे नाही पण जेव्हापासून द्रोण, पत्रावळ करायला आम्ही सुरवात केली तेव्हापासून आनंदी आहे. या कामातून पैसे मिळतात आणि घराला आर्थिक हातभार लागतो.''- प्रमिला शार्दूल, उमराळे खुर्द

''जीवनाश्यक साहित्य खरेदीसाठी गावात एकही दुकान नाही. काही आणायचे म्हटल्यास तालुक्याच्या गावी जावे लागते. या व्यवसायातून रोजगार मिळाला, काम करण्याचा आत्मविश्वास वाढला.''- स्नेहल सातभाई, दहिवी

Self-help group women preparing letters at Entrepreneur Center.
Nashik News : वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरातून नऊ जण बेपत्ता; 5 महिला, युवती आणि 4 पुरुषांचा समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com