Nashik News : वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरातून नऊ जण बेपत्ता; 5 महिला, युवती आणि 4 पुरुषांचा समावेश

Nashik News : शहर परिसरात घडलेल्‍या वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण नऊ जण बेपत्ता झाल्‍याची नोंद विविध पोलिस ठाण्यांमध्ये घेण्यात आलेली आहे.
missing
missing esakal

Nashik News : शहर परिसरात घडलेल्‍या वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण नऊ जण बेपत्ता झाल्‍याची नोंद विविध पोलिस ठाण्यांमध्ये घेण्यात आलेली आहे. यामध्ये पाच महिला, युवती, तसेच चार पुरुषांचा समावेश आहे. पहिल्‍या घटनेत ठाणे येथे राहणाऱ्या बहिणीकडे जाते असे सांगत घरातून निघालेली विवाहिता बेपत्ता झाल्‍याची तक्रार तिच्‍या पतीने म्‍हसरूळ पोलिस ठाण्यात दिली. (Nine people missing from city in different incidents)

सोनू कांबळे (रा. दिंडोरी रोड) यांच्‍या तक्रारीनुसार त्‍यांची पत्‍नी मीरा कांबळे या २४ एप्रिलला घरातून बाहेर पडल्या. ठाणे येथे राहणाऱ्या बहिणीकडे जाते, असे सांगत त्‍या निघाल्‍या होत्‍या. परंतु त्या घरी परत न आल्‍याने बेपत्ता असल्‍याची तक्रार दाखल केली आहे. दुसऱ्या घटनेत ३४ वर्षीय व्‍यक्‍ती बेपत्ता झाल्‍याची तक्रार त्‍यांच्‍या पत्‍नीने सातपूर पोलिस ठाण्यात दिली आहे.

सोमनाथ एकनाथ काळे असे बेपत्ता झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे. गेल्‍या २४ मार्चला पहाटेच्‍या सुमारास काहीही न सांगता घरातून निघून गेल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे. तिसऱ्या घटनेत ७५ वर्षीय वडील घरातून निघून गेल्‍याची तक्रार मुलाने सातपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळी आठच्‍या सुमारास विठ्ठल दत्तात्रय दळवी घरातून बाहेर पडले. शोधूनही सापडून न आल्‍याने त्‍यांचा मुलगा चिन्‍मय दळवी यांनी बेपत्ता झाल्‍याची तक्रार दाखल केली.

चौथ्या घटनेत माहेरी आलेली विवाहिता तिच्‍या जाऊबाईच्‍या घरी जाण्यासाठी निघाली असता, बेपत्ता झाली. पूजा हेमंत सूर्यवंशी (वय २४, रा. म्‍हसरूळ) असे बेपत्ता झालेल्‍या विवाहितेचे नाव असून, तिचा शोध घेऊनही सापडून न आल्‍याने तिची आई संगीता गांगवे यांनी म्‍हसरूळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाचव्‍या घटनेत बेपत्ता झालेल्‍या ३१ वर्षीय मुलासंदर्भात आईने म्‍हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

missing
Amravati Crime : शहरात ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा आढळल्या

सुनीता जगताप यांच्‍या तक्रार अर्जानुसार त्‍यांचा मुलगा कृष्णा एकनाथ जगताप (वय ३१, रा. पेठ रोड) हा ३० एप्रिलला कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला व पुन्‍हा परत आलेला नाही. सहाव्‍या घटनेत पती बेपत्ता झाल्‍याची तक्रार नयना शर्मा यांनी उपनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. तक्रारीत म्‍हटल्‍यानुसार, रामपरवेश दशरथ शर्मा गुरुवारी (ता. २) सकाळी पावणेआठच्‍या सुमारास घरातून बाहेर पडले.

मित्रासोबत नवीन काम बघण्यासाठी जात असून, कंपनीमध्ये मोबाईल फोन वापरता येणार नाही म्‍हणून घरीच फोन ठेवत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. परिसरात शोध घेऊनही न सापडल्‍याने बेपत्ता झाल्‍याची तक्रार नोंदविली आहे. सातव्‍या घटनेत तक्रारदार संजय किसन सुतार (रा. दीपालीनगर) यांची मुलगी प्रियांका संजय सुतार (वय २६) ही घरातून कुणालाही काहीही न सांगता गुरुवारी (ता. २) पहाटे साडेचारच्‍या सुमारास निघून गेली.

याप्रकरणी त्‍यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्‍याची नोंद केली आहे. आठव्‍या घटनेत तक्रारदार अनिता अशोक चोथे (रा. भगूर) यांची मुलगी सोनाली अशोक चोथे (वय २०) ही बुधवारी (ता. १) सकाळी अकरापासून बेपत्ता असल्‍याची तक्रार देवळाली कम्‍प पोलिस ठाण्यात दिली आहे. घरात कुणाला काहीही न सांगता निघून गेल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे. नवव्‍या घटनेत महाविद्यालयात जाऊन येते, असे सांगून घराबाहेर पडलेली ऐश्‍वर्या प्रकाश साळवे (वय २१, रा. जेल रोड) ही बेपत्ता झाल्‍याचे तिची आई सविता साळवे यांनी नाशिक रोड पोलिसांना कळविले आहे.

missing
Crime News: कल्याण जवळ दुकानात सापडला ४ कोटींच्या एमडीचा साठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com