Nashik Onion News : दुष्काळग्रस्त तालुक्यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक

Nashik News : सद्यस्थितीला कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एक लाख क्विंटल कांद्याची आवक होते. त्यापैकी २५ ते ३० टक्के आवक ही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये आहे.
Highest arrival of summer onion in drought affected taluk (file photo)
Highest arrival of summer onion in drought affected taluk (file photo)esakal

Nashik News : दुष्काळामुळे चारा व पाणी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवलेली असताना याच दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील काही शेतकऱ्यांनी शेततळे, ठिबक सिंचन व पाण्याच्या नियोजनावर उन्हाळ कांदा पिकविला आहे. सद्यस्थितीला कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एक लाख क्विंटल कांद्याची आवक होते. त्यापैकी २५ ते ३० टक्के आवक ही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये आहे. (Highest arrival of summer onion in drought affected taluk)

विशेष म्हणजे सरासरी १५०० ते १८०० रुपये क्विंटलने भाव मिळत असल्याने आवकही टिकून आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना कांद्याने चांगलेच रडविले. जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे एक हजार २२० गावांना ३७० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात कांद्याची भर पडल्याने निवडणुकीच्या रंगाचा बेरंग झाला.

राजकीय मुद्दा बाजूला ठेवला तरी सद्यस्थितीला जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दिवसाला एक लाख क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होते. पिंपळगाव बसवंतला सर्वाधिक २५ हजार क्विंटल, तर त्यापाठोपाठ लासलगावला साडेसहा हजार क्विंटल कांद्याची आवक होते. लासलगावला येणारा कांदा हा आजूबाजूच्या खेड्यांमधूनच येतो. या कांद्याला १५०० ते १८०० रुपये क्विंटलने भाव मिळत आहे.

यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे दुष्काळग्रस्त चांदवड, नांदगाव, सिन्नर, येवला, मालेगाव व बागलाण या तालुक्यांमध्ये टँकरचे प्रमाण अधिक आहे. नांदगावमध्ये ३४० गावांना ६९ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. येवल्यात ११८ गावांना ५७ टँकरने पाणी पुरविले जाते. सिन्नरमध्येही भीषण दुष्काळ पडल्याने येथील २६५ गावांना ४२ टँकरने पाणीपुरवठा होतो. चांदवडच्या १२६ गावांना ३३ टँकरने दररोज पाणी दिले जात असल्याने या भागात जनावरांना पाणी व चारा मिळणे अवघड झाले आहे. (latest marathi news)

Highest arrival of summer onion in drought affected taluk (file photo)
Nashik District Hospital : सिव्हिल, कारागृहातील खाबूगिरी पुन्हा चर्चेत!

अशा परिस्थितीत याच तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी शेततळे, ठिबक सिंचन व पाण्याच्या नियोजनावर उन्हाळ कांद्याचे पीक घेतले. काही शेतकऱ्यांनी तर टँकरने पाणी विहिरीत टाकून पिकांना पाणी दिले. त्याचे फलित म्हणजे उन्हाळ कांद्याचे पीक हाती आले आहे. शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठविलेला असला, तरी आता खरीप हंगाम जवळ आल्याने उन्हाळ कांद्याच्या विक्रीतून बियाणे, खते व रासायनिक औषधांची खरेदी होताना दिसते.

कांद्याने का रडविले?

शेतकरी अगोदरच दुष्काळाने पोळला गेलेला असल्याने त्यात कांद्याच्या निर्यातबंदीचा मुद्दा उठविला गेला. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना केंद्र सरकारने गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यात खुली केली. त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट तयार झाली.

कांद्याचा मुद्दा हाताळण्यात सत्ताधाऱ्यांना कुठेतरी अपयश आले आणि निर्यातबंदी काही प्रमाणात उठविल्याचा फायदाही घेता आला नाही. त्याचा निकालावर किती प्रभाव पडतो, हा भाग अलहिदा! पण कांद्याने सत्ताधाऱ्यांना चांगलेच रडविले, हे वास्तव आहे.

Highest arrival of summer onion in drought affected taluk (file photo)
Nashik News : आमदार खोसकर नेमके कोणीकडे? राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पवारांकडून उल्लेख

"जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे, हे वास्तव आहे. परंतु, काही शेतकऱ्यांनी शेततळी, ठिबक सिंचन व पाईपलाईनद्वारे पाणी आणून कांदा जगविला. शेतकरी प्रयोगशील तर झालाच, शिवाय नियोजनातही त्याने आघाडी घेतल्याने कांद्याचे उत्पादन वाढले आहे." - भारत दिघोळे, अध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना

बाजार समित्यांमधील कांद्याची परिस्थिती

२८ मे २०२४

बाजार समिती.......आवक............किमान दर.....कमाल दर....सरासरी

लासलगाव.............६,६००............७००...............२,०००...........१,७००

पिंपळगाव..............२५,०००.........५००.................२,४२५...........१,५००

मनमाड..................१,५००...........५००.................१,९८४..........१,५००

देवळा.....................३,६८१............४००.................२,१००..........१,८००

सिन्नर..................४६५...............५००..................१,९४१..........१,८००

२७ मे २०२४

बाजार समिती.......आवक............किमान दर.....कमाल दर....सरासरी

लासलगाव.............११,४३०............७००...............२,०१२...........१,७००

पिंपळगाव..............२५,०००.........५००.................२,३७०...........१,८००

मनमाड..................१,२६५...........२९०.................२,०५१..........१,७००

सिन्नर..................२,०३९...............५००...............१,८५५..........१,६५०

बागलाण................१५,०८५............५००................२,१४०..........१,७६०

चांदवड...................५,०००..............७५०.................२,२५१...........१,६००

नाशिक..................४,८७०..............७५०.................२,२५१...........१,६००

येवला.....................५,८३३..............४८७.................१,९०१...........१,५५०

Highest arrival of summer onion in drought affected taluk (file photo)
Nashik Lok Sabha Election : प्रत्येक मशिनचा नंबर उमेदवारांच्या मोबाईलवर; लोकसभा निवडणूक मतमोजणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com