Nashik News : येवल्यातील ऐतिहासिक मुक्तिभूमीला झळाळी! भुजबळांच्या उपस्थितीत रविवारी लोकार्पण सोहळा

Nashik : जागतिक पटलावर ओळख निर्माण केलेली मुक्तिभूमी भीमसैनिकांसाठी पवित्र तीर्थस्थान बनली आहे.
Stupas and other development works done on historical Mukti Bhoomi.
Stupas and other development works done on historical Mukti Bhoomi.esakal

Nashik News : जागतिक पटलावर ओळख निर्माण केलेली मुक्तिभूमी भीमसैनिकांसाठी पवित्र तीर्थस्थान बनली आहे. येथे राज्यभरातून दर्शनासाठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमीवर विविध विकासकामे झाली असून, मुक्तिभूमीचे रूप पालटले आहे. (nashik historic Mukti Bhumi in Yeola was inaugurated Bhujbal marathi news)

मुक्तिभूमीवरील १५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण रविवारी (ता. ३) दुपारी चारला होणार आहे. विकासकामांचे लोकार्पण नॉर्वे येथील भिक्खू वाटसनपॉन्ग मेडिटेशन सेंटरचे संचालक फ्रा ख्रुसुतमतावाचाई मठी आणि बुद्ध इंटरनॅशनल वेल्फेअर मिशन तसेच इंटरनॅशनल बुद्धिस्ट मॉक ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक सचिव भिक्खू बी. आर्यपल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. ३ ऑक्टोबर १९३५ ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली होती. १९३२ नंतर अनेक वर्षे दुर्लक्षित असलेली ही भूमी ७५ वर्षांनंतर नव्या देखण्या रूपात साकारल्याने बौद्ध धर्मीयांचे तीर्थस्थानच बनले आहे. (latest marathi news)

Stupas and other development works done on historical Mukti Bhoomi.
Nashik News : मालेगावातील वीजचोरीच्या चौकशीचे आदेश; प्लास्टिक कारखान्यांचाही समावेश

१३ ऑक्टोबरला तसेच १४ एप्रिलला जयंतीनिमित्त येथे कार्यक्रम होऊन लाखो भीमप्रेमी या भूमीवर नतमस्तक होतात. मात्र, अविकसित असल्याने येथे अनेक बाबींची उणीव होती. येथील नेतृत्व स्वीकारल्यावर २००५ मध्ये लगेचच श्री. भुजबळ यांनी मुक्तिभूमी विकासाकडे लक्ष केंद्रीत करीत कोट्यवधींचा निधीही उपलब्ध करून दिला. २००९ मध्ये येथे भव्य विश्वभूषण स्तूप, डॉ. बाबासाहेबांचा पुतळा, सुरक्षा भिंत, प्रवेशद्वार साकारले आहे.

यामुळे मुक्तिभूमीला नवे वैभव प्राप्त झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थळाला महाराष्ट्र शासनातर्फे ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. रांचीच्या धर्तीवर बौद्ध स्तूप, डॉ. आंबेडकरांचे शिल्प, आर्ट गॅलरी, वस्तुसंग्रहालय, अद्ययावत सभागृह, वसतिगृह, क्रांतिस्तंभ, ग्रंथालय, बहुउद्देशीय केंद्र, बगीचा आदी कामे बौद्ध वास्तुशैलीनुसार करण्याचे प्रस्तावित आहे.

उद्या होणार भूमिपूजन!

मुक्तिभूमी टप्पा दोन अंतर्गत सुमारे १५ कोटी रुपये निधी खर्च करून विविध विकासकामे करण्यात आली आहेत. यात पाली व संस्कृत अभ्यास केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, ऑडिओ व्हिज्युअल रूम, आर्ट गॅलरी, अॅम्पीथिएटर, मीटिंग हॉल, भिक्कू पाठशाला, १२ भिक्कू विपश्यना खोली, कर्मचारी निवासस्थान, डायनिंग हॉल, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते व लॅण्ड स्केपिंग या कामांचा समावेश आहे. या कामांचे लोकार्पण फ्रा ख्रुसुतमतावाचाई मठी आणि भिक्खू बी. आर्यपल यांच्या हस्ते होईल. या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Stupas and other development works done on historical Mukti Bhoomi.
Nashik News : निफाड तहसीलमधील जुने दस्त एका क्लीकवर उपलब्ध होणार! वेळेची होणार बचत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com