Nashik News : निफाड तहसीलमधील जुने दस्त एका क्लीकवर उपलब्ध होणार! वेळेची होणार बचत

Nashik : निफाड तहसील कार्यालयातील सर्व जुन्या महसुली दस्तांचे स्कॅनिंग आणि डिजिटल स्वाक्षरी करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे.
documents
documents esakal

Nashik News : निफाड तहसील कार्यालयातील सर्व जुन्या महसुली दस्तांचे स्कॅनिंग आणि डिजिटल स्वाक्षरी करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. यामुळे जुने दस्त एकाच क्लीकवर नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांचे नकलांसाठी खेटे आता वाचणार आहेत. येथील तहसील कार्यालयात सुमारे १९२१ वर्षांपासूनचे दस्त जतन करून ठेवले आहेत. (nashik Old dast will be available to citizens marathi news)

येथील रेकॉर्ड रूममध्ये कागदपत्रांचे गठ्ठे करून ठेवले आहेत. हे दस्तांचे गठ्ठे सांभाळताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. दररोज स्वच्छता करणे व वाळवीपासून सुरक्षा करताना कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते. मागणीनुसार दस्त शोधतानाही मोठा त्रास सहन करावा लागतो. आता या त्रासापासून मुक्तता होणार आहे.

महसुली अभिलेख अद्ययावत व संगणकीकरण उपक्रमातून येथील सर्व दस्तांचे संगणकीकरण झाले आहे. दस्तांची स्कॅनिंग प्रक्रिया जवळपास पूर्ण होत असून, खासरा पत्रक, जुने सात बारा, जन्म-मृत्यू नोंदी, फेरफार, कुळाचे कागदपत्र, गावठाण रेकॉर्ड, पाहणीपत्रक आदी दस्त स्कॅन करण्यात येत आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. वेगाने ही प्रक्रिया पूर्ण झाली. यामुळे आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळण्यास मदत होणार आहे.

कार्यालयातील खेटे वाचणार

निफाड तहसील कार्यालयात नकलेसाठी अर्ज केल्यानंतर शेतकरी किंवा नागरिकांना नक्कल हातात पडेपर्यंत कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. सातत्याने नकला देण्याची तारीख वाढवून दिली जाते. यामुळे अर्जदार त्रस्त होत होते. आता नवीन प्रणाली विकसित झाल्यानंतर काही क्षणात नक्कल मिळणार असल्यामुळे अर्जदाराचा त्रास वाचणार आहे. (latest marathi news)

documents
Nashik Political News : देवळाली मतदारसंघासाठी 3 कोटीचा निधी मंजूर

ई-फेरफार अंतिम टप्प्यात

फेरफार करून सातबारा उताऱ्यावर मालकी हक्कावर नोंद घेण्याची प्रचलित पद्धती अत्यंत वेळखाऊ आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री व्यवहाराचा दस्त नोंदविल्यानंतर सर्व दस्त व अर्ज तहसील कार्यालयात द्यावा लागतो. मंडलाअधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेऊन फेरफाराची नोंद केली जाते.

ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ व गैरसोयीची आहे. आता ई-फेरफार पद्धती विकसित करण्यात आली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. निबंधकांकडे दस्ताची नोंदणी झाल्यावर तहसील कार्यालयात याची सूचना ऑनलाइन पद्धतीने मिळेल. यानंतर दस्त लिहून देणार व घेणार यांना नोटीस पाठवून तत्काळ फेरफार नोंद होणार आहे.

लवकरच प्रणाली सुरू

सर्व स्कॅनिंग झाल्यानंतर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. संगणकावर क्लीक केल्यानंतर काही क्षणातच दस्त उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील १३५ गावांतील दस्तांची नोंदणी वेगाने केली जात आहे.

documents
Nashik News : नासर्डी पुलावरील संरक्षक कठडा गायब! हजारो प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

कागदपत्रांचे एकत्रीकरण

बहुतांश ठिकाणचे महसुली दस्त तलाठी सज्जाच्या कार्यालयात आहेत. यामुळे बहुतांशवेळी शेतकऱ्यांची तलाठी व तहसील कार्यालयातून टोलवा टोलवी होते. आता एकाच ठिकाणी नक्कल मिळणार असल्याने हा प्रकार थांबणार आहे.

''निफाड तहसील कार्यालयातील एकूण १८१९४९६ जुन्या दस्तांचे स्कॅनिंग आणि डिजिटल स्वाक्षरी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन नागरिकांना कोणतेही जुने दस्त काढता येणार आहेत. या प्रक्रियेमुळे अर्जदारांचे वेळ, परिश्रम वाचण्यास मदत होणार आहे.''-विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड

''एकाच नोंदीसाठी अनेक चक्कर मारावे लागत होते, पण नवीन प्रणालीच्या माध्यमातून जुन्या फेरफार नोंदी उपलब्ध होणार असल्याने वेळेत व खर्चात बचत होणार आहे.''-अंबादास शेलार, शेतकरी, ओझर

दृष्टिक्षेपात निफाड तालुका

एकूण मंडले : ११

एकूण गावे : १३५

documents
Nashik News: उत्पन्नात वाढीसाठी बाजार फी वसुलीचे खाजगीकरण; 5 वर्षांसाठी ठेकेदार नियुक्तीला मान्यता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com