Nashik News : कैरी खरेदीसाठी बाजारात वर्दळ; पावसाच्या आगमनाने गृहिणींची लगबग

Nashik : पावसाच्या आगमनानंतर महिलांची लोणचे भरण्याची लगबग सुरू होते. पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने लोणचे सुरक्षित असते.
Citizens buying curry for pickles in the market for weeks.
Citizens buying curry for pickles in the market for weeks.esakal

Nashik News : पावसाच्या आगमनानंतर महिलांची लोणचे भरण्याची लगबग सुरू होते. पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने लोणचे सुरक्षित असते. म्हणूनच सर्वत्र लोणचे भरण्यासाठी लागणाऱ्या कैरी खरेदीसाठी बाजारात वर्दळ वाढली आहे. या लोणच्यासाठी गावरान कैरीचा पसंती असते. सध्या बाजारात बागलाणच्या पश्‍चिम पट्ट्यातील लोणच्यासाठी कैरी येत आहे. (Housewives have become busy with arrival of rains in markets to buy mango )

या कैरीला भरपूर मागणी आहे. रोजच्या जेवणात भाजी-भाकरी, पोळी, पापड, चटणी हे असले तरी अंबट गोड असलेले कैरीच्या लोणच्याची चव चाखण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. यासाठी बाराही महिने पुरेल, असा अंदाज घेत महिला लोणचे तयार करण्यासाठी पूर्णवेळ देतात. शेजारील आजीबाईंच्या सल्ल्यानुसार लोणचे भरतात. यासाठी मोजून मापून पदार्थ घ्यावे लागतात. लोणच्यासाठी लागणाऱ्या कैरीसाठी आता बहुतांश ठिकाणी नात्या-गोत्याची मदत मिळत आहे.

लोणच्यासाठी असा येतो खर्च

१०० ते १२० कैरीसाठी खर्च

मोहरीडाळ : १८० रूपये (दीड किलो)

मेथीडाळ : ६० रुपये (२०० ग्रॅम)

लवंग मिरी : ६० रुपये (५० ग्रॅम)

हिंग : १०० (२०० ग्रॅम)

बडिशेप : १०० (२०० ग्रॅम)

हिरा हिंग : ३० (२० ग्रॅम)

हळद : ८० रुपये (२०० ग्रॅम)

दालचिनी : ३० रुपये (२० ग्रॅम)

वेलदोड : ८० रुपये (२० ग्रॅम)

जायफळ : ३० रुपये (३ नग)

५ किलो शेंगदाणा तेल : ८८० रुपये

मिरची पावडर : २४० (एक किलो) (latest marathi news)

Citizens buying curry for pickles in the market for weeks.
Nashik News : पॉवर ट्रान्सफार्मर फुटल्याने नाशिक शहरासह 80 गावांचा वीज पुरवठा खंडित

असा आहे गावरान कैरीचा भाव

छोटी कैरी : ३०० ते ३५० रुपये

मोठी कैरी : ४०० ते ५०० रुपये

लहान बरणी : १०० ते १२० रुपये

मध्यम बरणी : १५० ते १८०

मोठी बरणी : २०० ते २५०

Citizens buying curry for pickles in the market for weeks.
Nashik News : पोलिस सुरक्षेशिवाय गौणखनिज कारवाई नको; जिल्हा तलाठी संघाची कार्यकारिणी बैठकीत एकमुखी निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com