Nashik News : गृहिणींची कडधान्याला पसंती; भाजीपाला महागल्याने बजेट बसविण्याचा प्रयत्न

Nashik News : आवक घटल्याने सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या दराने तेजी गाठली आहे. त्यामुळे बुधवारच्या आठवडे बाजारातही बहुतेक भाज्यांचे दर शंभर रुपयांपर्यंत पोचले आहेत.
pulses
pulsesesakal

Nashik News : आवक घटल्याने सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या दराने तेजी गाठली आहे. त्यामुळे बुधवारच्या आठवडे बाजारातही बहुतेक भाज्यांचे दर शंभर रुपयांपर्यंत पोचले आहेत. त्यामुळे अनेक गृहिणींनी भाजीपाल्यापेक्षा कडधान्याला पसंती दिली आहे. राज्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस सुरू झालेला असला तरी नाशिक परिसरातील अनेक भागात मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. पाऊसही लांबल्याने बुधवारच्या आठवडे बाजारात सर्वच भाज्यांचे दर तेजीत राहिले. (Housewives preference for pulses)

किलोभर गवारसाठी एकशे वीस रुपये तर इतर सर्वच भाज्या ऐंशी ते शंभर रुपये किलोने उपलब्ध होत्या. टोमॅटो, वांगी, कारली, शेवगाच्या शेंगा यांच्या दरांतही मोठी वाढ झाली. त्यामुळे महिलांची पसंती उसळ, काबुलीचणा, मटकी, पावटा आदी कडधान्याला राहिली.

कांदे, बटाटेही महागले

पालेभाज्या, फळभाज्यांच्या दरांत वाढ झाली की, बटाटांच्या दरांतही वाढ होत असल्याचा गृहिणींचा अनुभव आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी वीस रुपये किलोने उपलब्ध असलेल्या किलोभर बटाट्यांसाठी चक्क चाळीस रुपये मोजावे लागत होते. कांदेही तीस ते चाळीस रुपये किलोपर्यंत पोचले आहेत. (latest marathi news)

pulses
Nashik ZP School News : विद्यार्थ्यांचा जुन्या गणवेशातच पहिला दिवस; मुख्यालयातील विभागप्रमुखांच्या उपस्थितीत रंगणार प्रवेशोत्सव

मेथी, कोथिंबीर गायब

आठवडे बाजारात मेथी, कोथिंबीर यांच्या आवकेत मोठी घट झाल्यामुळे मेथीची जुडी चाळीस ते पन्नास रुपये तर कोथिंबिरीच्या जुडीसाठी साठ ते ऐंशी रुपये मोजावे लागत होते. कारले, गिलके, भोपळा या वेलवर्गीय भाज्यांच्या दरांतही मोठी वाढ झाली आहे.

उशिरापर्यंत भरतोय बाजार

सध्या पावसाळा सुरू असला तरी दुपारच्या सुमारास तीव्र उन असते, त्यामुळे खरेदीदार या काळात बाजाराकडे फिरकत नाहीत. दुपारच्या सुमारास ग्राहकच नसल्याने अनेक विक्रेते व शेतकरी चक्क पाचनंतर बाजारात दाखल होतात, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत येथील बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी उसळते. त्यामुळे गणेशवाडी भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीही होते.

pulses
Nashik Kharif Season : जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांची प्रतीक्षा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com