९० मीटर उंची पर्यंत पोहोचणारी हायड्रोलिक शिडी वापराविना

९० मीटर उंची पर्यंत पोहोचणारी हायड्रोलिक शिडी वापराविना
Published on: 
पान तीन ॲंकर ------------- महापालिकेची आधुनिक हायड्रोलिक शिडी वापराविना प्रादेशिक परिवहन विभागाच्या परवानगी वरून अडले घोडे सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २७ : शहर विस्तारात इमारतींची वाढती उंची लक्षात घेऊन आग प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून महापालिकेने फिनलॅण्डहून खरेदी केलेल्या शिडीला अद्यापपर्यंत आरटीओकडून परवाना मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ३१ कोटी रुपये खर्च करूनही हायड्रोलिक शिडी अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दाखल झाली असली तरी अद्यापही वापराविना पडून आहे. शहरात गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहे. या परिस्थितीत आग लागण्याची घटना घडल्यास ९० मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकणाऱ्या हायड्रोलिक शिडीची अशक्यता आहे. एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीमध्ये शिडी खरेदीचे बंधन देखील घालण्यात आले आहे. त्याअनुषंगाने महापालिकेने २०२३ मध्ये शिडी खरेदीचा निर्णय घेतला. अशा प्रकारची हायड्रोलिक शिडी फिनलॅण्ड देशात तयार केली जाते. यासाठी महापालिकेने ब्राँटो स्कायलिफ्ट कंपनी सोबत करार केला. दोन वर्षे खरेदीची प्रक्रिया सुरु होती. अखेरीस खरेदीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी जेएनपीए बंदरावर शिडी दाखल झाली तेव्हापासून आरटीओकडे परवाना मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. अद्यापही परवानगी मिळाली नाही. ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायड्रोलिक शिडीचे औपचारिक उद्‌घाटन करण्यात आले. परंतू, परवानगी विना शिडी ताफ्यात दाखल झाली असली तरी वापरता येत नसल्याने महापालिकेच्या अग्निशमन विभागाची अडचण झाली आहे. अग्निशमन शिडी परदेशी बनावटीची आहे. त्यामुळे आरटीओकडून नोंदणी प्रक्रियेला विलंब होत आहे. दिल्ली येथून कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरु आहे. नोव्हेंबरमध्ये नाशिक आरटीओ मध्ये नोंदणी केली जाणार असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले. ------------------ असा असेल शिडीचा वापर उंच इमारतींच्या अनुषंगाने अग्निशमन दलाची प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी हायड्रोलिक शिडी महत्त्वाची आहे. ३६० अंशात फिरणाऱ्या लॅडरमुळे इमारतीच्या कोणत्याही बाजूने बचावकार्य करता येते. नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आणि प्रतिमिनिट ३८०० लिटर पाणी फेकणाऱ्या मॉनिटरमुळे उंच इमारतींवरील आग विझवण्यासाठी याचा प्रभावी वापर शक्य होणार आहे. -----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com