6-year-old student injured in Igatpuri school accident
esakal
नाशिक
Nashik School Accident : शिक्षकाच्या कारनं पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थ्याला 15 फूट फरपटत नेलं, डोक्याला पडली चार टाके, व्हिडिओ व्हायरल
What Happened in the Igatpuri School Car Accident? : इगतपुरीतील शाळेच्या आवारात शिक्षकाच्या कारची धडक बसून पहिलीत शिकणारा सहा वर्षीय विद्यार्थी जखमी झाला. त्याच्या डोक्याला चार टाके पडले आहेत.
इगतपुरी (नाशिक) : शाळा सुटण्याच्या वेळी इगतपुरीतील एका शाळेच्या आवारात घडलेल्या धक्कादायक घटनेत पहिलीत शिकणारा सहा वर्षीय विद्यार्थी जखमी झाला (Nashik School News) आहे. बुटाची लेस बांधत असताना शिक्षकाच्या कारने त्याला धडक दिली. या धडकेत मुलाला सुमारे १५ फूट फरपटत नेल्याची माहिती समोर आली आहे.
