Nashik: वीस लाखांची खंडणी मागणाऱ्यास पोलिसांसमोरच चोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीस लाखांची खंडणी मागणाऱ्यास पोलिसांसमोरच चोप

नाशिक : वीस लाखांची खंडणी मागणाऱ्यास पोलिसांसमोरच चोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिडको : माऊली लॉन्स परिसरात एका माथेफिरूने मेडिकल दुकान चालकाकडे वीस लाखाची खंडणी मागत शिवीगाळ करून दुकानाची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. अभिषेक पाटील (२१, रा. खुटवडनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संशयित जगदीश गांगुर्डे याने माऊली लॉन्स परिसरातील असलेले इंद्रायणी मेडिकल येथे बुधवारी (ता. १०) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुकानात येऊन मेडिकल चालकास शिवीगाळ करत खंडणीची मागणी करत दगडफेक केली.

दगडफेकीत मेडिकल दुकानाच्या काचा फुटून नुकसान झाले. या वेळी सैन्य दलातील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक सयाजी साळुंखे यांनी संशयित गांगुर्डे याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्याने त्यांच्यावर वार करत जखमी केले. जमलेल्या संतप्त जमावाने पोलिसांच्या तावडीत असलेल्या गांगुर्डेला चांगलाच चोप दिला. विशेष पोलिस बीट मार्शल असताना धाक न बाळगता संशयित गांगुर्डे याने जमावाला शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top