Nashik News : ओझरच्या उप मुख्याधिकाऱ्यांची तातडीने बदली; स्नेहा फडतरे नियुक्त

Nashik News : बदली प्रस्ताव अनेक महिन्यांपासून धुळखात असताना त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याची थेट उचलबांगडी करत उपमुख्याधिकारी स्नेहा फडतरे यांची नियुक्ती प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी केली आहे.
transfers
transfers esakal

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्या वर्षभरापासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने नगर परिषद कारभाराबाबत अनेक त्रुटी समोर आल्याने त्या सुरळीत करण्यासाठी नव्याने बदलून आलेल्या काही अनुभवी अधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या कामकाजावर सखोल मंथन करत दिलेला अंतर्गत बदली प्रस्ताव अनेक महिन्यांपासून धुळखात असताना त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याची थेट उचलबांगडी करत उपमुख्याधिकारी स्नेहा फडतरे यांची नियुक्ती प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी केली आहे. (Immediate transfer of Ozar deputy chief Appointed by Sneha Phadtare)

आज देखील ओझरमध्ये पाण्यापासून अनेक नागरी समस्या जैसे थे असताना पूर्णवेळ आम्हाला मुख्याधिकारी हवे, अशी मागणी कायम आहे. अशातच ज्या काही मुद्द्यांना वेगळ्या चर्चेचे रूप लाभले त्याला मिटायला केवळ अंतर्गत बदल्या अपेक्षित होत्या. परंतु, मुख्याधिकाऱ्यांनी ‘पाहू नंतर’चा पवित्रा घेत त्यास थांबा दिला. हा विषय सर्वत्र चर्चिला गेला तेव्हा त्यास उपाय म्हणून मुख्याधिकाऱ्यांची अनुपस्थिती हे कारण दिले जात होते.

परंतु, मुख्याधिकाऱ्यांनी बुधवार आणि शुक्रवार हे दिवस ओझरकरांच्या सेवेसाठी दिल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले. परंतु, बदली हा अंतर्गत विषय असूनही त्याला मोठी लांबी भरली गेल्याने तो सार्वजनिक होऊन बसला आहे. त्यामुळे दबाव बरकरार ठेवण्यासाठी अखेर उपमुख्याधिकारी बदलेले गेल्याची चर्चा आहे. (latest marathi news)

transfers
Nashik Accident Updates : रासबिहारी लिंक रोडवर वाढते अपघात!

उर्वरित तीन दिवस नव्या अधिकाऱ्यांना प्रशासन कामकाज आणि निर्णय घेण्याची मुभा प्रभारी अधिकाऱ्यांनी दिल्यास काही प्रमाणत ओझरचे प्रश्‍न मार्गी लागतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. याच कर्मचारी बदलीमुळे कामकाजात सूसुत्रता येणार, अशी चर्चा असताना किरण देशमुख यांनी तो विषय कुणामुळे थांबविल्याची मात्र चर्चा चांगलीच रंगली आहे.

विवाह नोंदणी पुन्हा रखडली!

विवाह नोंदणीबाबत इतके दिवस सुरळीत कामकाज होते. आता पुन्हा त्या फाईली रखडल्याने नवदाम्पत्याना वेळ घेऊन चकरा माराव्या लागत आहे. सबंधित कर्मचाऱ्यांनी सर्व काही सुरळीत करूनही केवळ सहीसाठी जोडप्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याने तो मार्गी लागावा, अशी मागणी आहे.

transfers
Nashik News : पोलिसांनी कारवाई करावी : आयुक्त प्रवीण गेडाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com