Vegetable Rate Hike
Vegetable Rate Hikeesakal

Nashik Vegetable Rate Hike : पालेभाज्या, फळभाज्या आवक घटली; भाव वधारले

Nashik News : पावसामुळे बाजार समितीमध्ये पालेभाज्या व फळभाज्यांची आवक घटल्याने भाव वधारले आहे. त्यामुळे भाजीपाला खरेदी करताना गृहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

Nashik News : नाशिक शहर व परिसरात दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून शुक्रवारी (ता.५) पावसाची उघडीप सुरू होती. पावसामुळे बाजार समितीमध्ये पालेभाज्या व फळभाज्यांची आवक घटल्याने भाव वधारले आहे. त्यामुळे भाजीपाला खरेदी करताना गृहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. (Imports of leafy vegetables fruits decrease and Price increase)

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्य:स्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागातून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. पावसामुळे पालेभाज्या व फळभाज्यांची आवक पंधरा ते वीस टक्क्यांवर आली आहे. यामुळे दर वधारले असून स्थानिक पातळीवर होणारी विक्री किंमत परिणामी वाढली आहे.

फळभाज्यामध्ये सध्या काकडी, शिमला यांची ऋतुनुसार आवक आहे, मात्र, दोडके, कारली, गिलके आदी फळभाज्यांची आवक घटली आहे. बाजार समितीत शुक्रवार झालेल्या लिलावात काकडी ७ ते २५ रुपये किलो, दुधी भोपळा २० ते ३० रुपये प्रति किलो, गिलके ५५ ते ६५ रुपये किलो, कारले ७० ते ८० रुपये प्रति किलो, दोडका ६५ ते ७५ रुपये प्रति किलो, शिमला मिरची ४६ ते ६० रुपये प्रति किलो, हिरवी मिरची ७५ रुपये ते ८५ प्रति किलो रुपये, वाल ७० ते ८० रुपये प्रतिकिलो. (latest marathi news)

Vegetable Rate Hike
Nashik Water Shortage : 935 गावे-वाड्यांना 228 टॅंकरद्वारे पाणी; पावसाअभावी टॅंकरला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

गवार ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो, घेवडा ७० ते ९० रूपये प्रतिकिलो, गाजर २० ते ३० रुपये प्रति किलो, वांगी ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो असे दर मिळाला आहे. किरकोळ विक्रेत्यांकडे हेच दर प्रतिकिलो तीस ते चाळीस रुपये वाढीव असतात.

बाजार समितीत गावठी कोथंबीर २५ ते ९८ रूपये जुडी, मेथी २० ते ५८ रूपये जुडी, शेपू १५ ते ४० रूपये जुडी, कांदापात २५ ते ८१ रुपये जुडीचा दर मिळत आहे. तेच किरकोळ बाजारात कोथिंबीर,मेथी,शेपू, कांदापात यांची डबल बाजार भावाने विक्री होत आहेत.

Vegetable Rate Hike
Nashik Dengue Update : जिल्ह्यात आतापर्यंत 79 रुग्णांना डेंगीची लागण! जूनमध्ये 28 डेंगींचे रुग्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com