Nashik Airport : 10 वर्षांत 7 लाख प्रवाशांचा प्रवास; ओझर विमानतळावरून आगामी काळात सेवेचा होणार विस्‍तार

Nashik Airport : प्रदीर्घ संघर्षानंतर ओझरच्‍या धावपट्टीवरून प्रवासी वाहतूक करणारे विमान झेपावल्‍यानंतर आजवर अनेक विमानांनी उड्डाण केले आहे.
Nashik Airport
Nashik Airport esakal
Updated on

Nashik Airport : प्रदीर्घ संघर्षानंतर ओझरच्‍या धावपट्टीवरून प्रवासी वाहतूक करणारे विमान झेपावल्‍यानंतर आजवर अनेक विमानांनी उड्डाण केले आहे. नाशिकमध्ये विमानसेवेला दहा वर्षे पूर्ण होत असताना आजवर सात लाखांहून अधिक प्रवाशां‍नी ओझर विमानतळावरून प्रवास केला आहे. शासनाच्‍या विविध योजना व नाशिकचे वाढते भौगोलिक महत्त्व यांमुळे आगामी काळात प्रवासी संख्या आणखी वाढत जाणार असल्‍याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे. (nashik Ozar airport marathi news)

‘एचएएल’‍ परिसरात साकारलेल्‍या ओझर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी वाहतुकीच्‍या विमानसेवेला ३ मार्च २०१४ रोजी सुरवात झाली होती. रविवारी (ता.३) या सेवेला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. विमानतळाच्‍या क्षमता ओळखून विविध कंपन्‍यांकडून आजवर येथून सेवा उपलब्‍ध करून दिलेली होती.

देशातील सर्व मोठ्या व प्रमुख शहरांसाठी ओझर विमानतळावरुन विमानसेवा उपलब्‍ध झालेली होती. सद्यःस्‍थितीत ही संख्या रोडावलेली असली तरी येत्‍या काळात पुन्‍हा पूर्ण क्षमतेने ओझर विमानतळावरून प्रवासी वाहतूक होऊ शकेल, असे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

विमानतळ उभारणीचा प्रवास असा

मार्च २०११ एचएएल आणि राज्‍य शासन यांच्‍यात सामंजस्‍य करार झाला होता. त्‍यानुसार ‘एचएएल’ने २२ एकर जागा उपलब्‍ध करून दिली होती. या जागेत राज्‍य शासनाने ८४ कोटी रुपये खर्चून टर्मिनल बिल्‍डींग उभारली. तर एचएएलतर्फे १० कोटींची आवश्‍यक उपकरणे बसविण्यात आली होती.

जानेवारी २०१२ मध्ये विमानतळ उभारणी कामाचे भूमिपूजन झाले. ३ मार्च २०१४ ला विमानसेवेचा प्रारंभ झाला होता. तत्‍कालीन नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्‍ल पटेल यांच्‍या उपस्‍थितीत हा कार्यक्रम झाला होता.(latest marathi news)

Nashik Airport
Mumbai Airport : ८० वर्षीय प्रवाशाचा व्हिलचेअर न मिळाल्याने मृत्यू; मुंबई विमानतळावरील घटना

अन्‌ विमानसेवा सुसाट..

विमानतळाच्‍या उद्‌घाटनानंतर सुरवातीचे तीन-चार वर्षे विमानसेवा सुरू होऊ शकली नव्‍हती. खऱ्या अर्थाने २०१७ मध्ये विमानसेवा सुरू झाली. त्‍यानंतर उडाण योजनेत जेट एअरवेजने सेवा सुरू केली. २०१८ मध्ये स्‍टार एअर, ट्रुजेट, स्‍पाईस जेट, एअर अलायन्‍स व इंडिगो या कंपन्यांनी नाशिकमधून सेवेला सुरवात केली.

प्रवाशांचा प्रतिसाद पाहता नाशिकहून मुंबई, पुणे, बेळगाव, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळूर, दिल्‍ली, नागपूर, गोवा, इंदूर आदी शहरांसाठी विमानसेवा सुरू झाली होती. सध्या केवळ इंडिगोमार्फत सेवा सुरू आहे. २०२३ मध्ये तब्‍बल २ लाख १६ हजार प्रवाशांनी ओझर विमानतळावरून प्रवासाला पसंती दिली.

एअरबसच्‍या कराराने संजीवनी

‘डीजीसीए’मार्फत ओझरला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्‍हणून मान्‍यता दिलेली आहे. त्‍यामुळे निर्यातीसाठी येथून मोठ्या संख्येने कार्गो झेप घेतात. मात्र प्रवासी वाहतूक एअरक्राफ्टची संख्या कमी असल्‍याने तसेच वैमानिकांचा तुटवडा असल्‍यामुळे सेवा रोडावलेली आहे.

दरम्‍यान नोव्‍हेंबर २०२३ मध्ये एअरबस व एचएएल यांच्‍यात सामंजस्‍य करार झालेला आहे. त्‍यानुसार आशिया स्‍तरावरील एअरबसचे विमान देखभाल दुरुस्‍तीसाठी नाशिकला दाखल होणार आहे. यामुळे येथील विमानसेवेला संजीवनी प्राप्त होईल, असेही सांगितले जाते.

आंतरराष्ट्रीय व भारताच्‍या स्‍तरावर ओझर

''विमानतळाहून दर महिन्‍याला १ लाख प्रवासी वाहतूक करू शकतात. इतकी नाशिकमध्ये क्षमताही आहे. त्‍यामुळे येत्‍या काळात विमानसेवा आणखी सक्षम होईल. एअरबससोबत झालेल्‍या करारामुळे स्‍थानिक अर्थव्‍यवस्‍था बळकट होण्यासोबत रोजगार वाढीसाठी मदत होणार आहे.''- मनीष रावल, एविएशन कमिटी, निमा

Nashik Airport
Nashik Airport : ओझरला भविष्यात दुसरा स्वतंत्र रनवे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com