

नाशिक : राज्यात महायुतीला सत्तेचे सिंहासन मिळवून देण्यात लाडकी बहीण अग्रणी ठरली. निवडणुकीत यापूर्वी गावकीभावकी, नातेसंबंध व घराणेशाहीची चर्चा असते. मात्र या वेळी घराणेशाही कायम असली तरी निवडणूक प्रचारात लाडकी बहीण, लाडका भाऊ हा मुद्दा आघाडीवर होता. बहिणींनी सत्ताधारी महायुतीच्या सात लाडक्या भावांना विजयी केले आहे. एक लाडका भाऊ पराभूत झाला. विजय उमेदवारांमध्ये एका लाडक्या बहिणीचाही समावेश आहे. विरोधी महाविकास आघाडीचे चार सावत्र भाऊ विजयी झाले आहेत.