Nashik Citylink Bus : सिटीलिंक बसचे वाढते अपघात! चालकांना मासिक प्रशिक्षण बंधनकारक

Nashik News : महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून शहरात चालविल्या जाणाऱ्या बसचे अपघाताचे प्रमाण वाढल्याचा अहवाल महापालिका प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.
Citylink bus
Citylink bus esakal

Nashik News : महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून शहरात चालविल्या जाणाऱ्या बसचे अपघाताचे प्रमाण वाढल्याचा अहवाल महापालिका प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. आतापर्यंत गंभीर स्वरूपाचे २२, तर किरकोळ स्वरूपाचा एक अपघात झाला आहे. त्यामुळे बसचालकांना प्रशिक्षण देण्याचा सल्ला अहवालात देण्यात आला आहे. (Increasing accidents of Citylink bus)

महापालिकेकडून जुलै २०२१ पासून शहरात सिटीलिंक कंपनीकडून बस चालविल्या जातात. जवळपास अडीचशे बस शहरात सुरू आहे. ग्रॉस कॉस्ट कटिंग या तत्त्वावर बस चालविताना चालक व वाहक पुरविण्याची जबाबदारीदेखील आउटसोर्सिंगच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तपोवन आगारामध्ये २८७ इतर नाशिक रोड आगारात १८६ असे एकूण ४७३ चालक आहेत.

बस चालविताना त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे सिटीलिंक प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे. त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये बस चालविताना रस्त्याच्या मधोमध बस थांबविणे, मोठ्या प्रमाणात हॉर्न वाजविणे, प्रवाशांशी अरेरावी अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या आहे.

अपघातात दोन नागरिकांचा मृत्यू

८ जुलै २०२१ ते ३१ मार्च २०२२ कालावधीत गंभीर स्वरूपाचे पाच अपघात घडले, १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये गंभीर स्वरूपाचे १७, तर किरकोळ स्वरूपाचा एक अपघात झाला. या काळात चार नागरिकांचा मृत्यू झाला. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीमध्ये किरकोळ स्वरूपाचे चार अपघात झाले. तर गंभीर स्वरूपाचे २० अपघात झाले. यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला. (latest marathi news)

Citylink bus
Nashik News : पोलिसांनी कारवाई करावी : आयुक्त प्रवीण गेडाम

अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सिटीलिंक कंपनी व्यवस्थापनाने प्रशिक्षणाचा प्रस्ताव सादर केला आहे. सिटीलिंक कंपनी कार्यालयात पोलिस अधिकारी व अपघातासंदर्भात माहिती देणारे व्याख्यान आयोजित करणे, दर रविवारी पंचवटी व नाशिक रोड आगाराच्या प्रत्येकी २५ चालकांना सुरक्षित बस चालविण्यासंदर्भात प्रशिक्षण देणे.

नाशिक फर्स्ट या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे, चालकांचे मनोबल वाढविणे असे प्रयत्न केले जात आहे. त्यात अधिक वाढ करण्याचे सुचविण्यात आले आहे. पंचवटी व नाशिक रोड आगारातील प्रत्येकी २५ चालकांना बस चालविताना नियमांचे पालन कसे करावे व सुरक्षिततासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अपघाताची कारणे

- बस वेगाने चालविणे

- बस चालविताना मोबाईलवर बोलणे

- धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करणे

- दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे

- सिग्नल तोडणे.

- ड्रायव्हिंग करताना प्रवाशांशी बोलणे.

- बस मागे घेताना वाहकाच्या मदतीने मागे न घेणे

- अपघात सुरक्षेचे नियम न पाळणे

- बस चालविताना दोन्ही दरवाजे बंद न करणे

Citylink bus
Nashik Child Malnutrition News : सुरगाणा तालुक्यात 13 बालके कुपोषणमुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com