नाशिक: अवघ्या दहा दिवसांवर स्वातंत्र्य दिन येऊन ठेपला असताना, जिल्ह्यात यंदाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण कोण करणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महायुतीच्या शासनात वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन व दादा भुसे या तिघांपैकी कोणाला हा मान मिळणार, याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.