जुने नाशिक: स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तिरंगी झेंडे आणि देशभक्तिपर विविध वस्तू बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. ठिकठिकाणी या वस्तूंची दुकाने सजल्याने देशभक्तिपर वातावरणाने बाजारपेठ बहरल्याचे दिसून येत आहे. अवघ्या चार दिवसांवर स्वातंत्र्य दिन येऊन ठेपला आहे. सर्वत्र तयारीच वेग आला आहे. चिमुकल्यांसह नागरिकांमध्येदेखील उत्साह दिसून येत आहे.