ndustrial Growth
sakal
नाशिक
Nashik Industrial Growth : 'आयमा इंडेक्स'ला बंपर प्रतिसाद; पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये ₹१,३३२ कोटींचे गुंतवणूक करार
Indo-Africa Investment Opportunities Discussed in Nashik : नाशिक येथे अंबड इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनतर्फे (आयमा) आयोजित ‘आयमा इंडेक्स- २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी दक्षिण आफ्रिकेतील भारताचे उच्चायुक्त अनिल सुखलाल आणि अन्य मान्यवर. यावेळी त्यांनी नाशिकच्या उद्योजकांना दक्षिण आफ्रिकेत गुंतवणुकीचे आवाहन केले.
नाशिक: भारत व दक्षिण आफ्रिकेतील मैत्री जुनी आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते क्रिकेटच्या सामन्यांपर्यंत विविध धाग्यांनी दोन्ही देश बांधले आहेत. हे संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी इंडो-आफ्रिकेंतर्गत औद्योगिक गुंतवणुकीसाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा दक्षिण आफ्रिकेतील भारताचे उच्चायुक्त अनिल सुखलाल यांनी व्यक्त केली. नाशिकच्या उद्योजकांनी दक्षिण आफ्रिकेत गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
