
नाशिक : गेल्या वर्षभरात नाशिक जिल्ह्यातून १६२ तक्रारी राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक १२१ तक्रारी ग्रामीण भागातील आहेत. या तक्रारी सोडविण्यासाठी आयोगाच्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. येत्या काळात तक्रारींची संख्या कमी करण्याला प्राधान्य असेल, अशी माहिती आयोगाच्या सदस्या वैदेही वाढाण यांनी मंगळवारी (ता.२८) दिली.