
नाशिक : आयुष्याच्या रोजच्या वाटचालीत प्रत्येकाच्या वाट्याला आव्हाने ही ठरलेलीच असतात. मात्र, त्यांची तीव्रता कमी-अधिक असू शकते. शेतमजूर कुटुंबात जन्माला येताना मात्र गरिबी जणू ती सोबतच घेऊन आलेली होती. आई-वडिलांच्या संस्कारांच्या सावलीत वाढत असताना मात्र परिस्थिती जणू तिची परीक्षाच घेत राहिली. अभ्यासात हुशार असल्याने शिकून सवरून स्वतःची ओळख निर्माण करण्याचे स्वप्न तिनेही बालपणापासूनच पाहिले होते, मात्र माहेरच्या परिस्थितीमुळे ते शक्यही होत नव्हते.