Inspirational Story : अंधत्व झुगारून कविताने समाजासमोर ठेवला आदर्श

Nashik News : सकारात्मक विचारांवर पती-पत्नीने जगाला बघण्यासाठी दृष्टी नसतानाही मसाज सेवेतून आजारी रुग्णांसाठी आधार बनत जगासमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवत संधीचं सोनं केलं ते नाशिकच्या मखमलाबाद येथील कविताताई अनिल पिंगळे...
Kavitatai Anil Pingle
Kavitatai Anil Pingleesakal

वयाच्या अकराव्या वर्षीच आयुष्यात अंधत्व आलं... अभ्यासात हुशार असूनही दृष्टी गेल्याने सातवीतच शिक्षण सुटलं. रोजचा दिवस जणू आव्हानं घेऊन येणारा... मात्र समोर आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याशिवाय पर्याय नाही, असा जणू तिनं मनाशी चंगच बांधला. समोर अंधार दिसत असतानाच तिच्या आयुष्याला आधार देण्यासाठी अंध असलेल्या पतीने जगण्याचं बळ दिलं.

परिस्थिती कशीही असली तरी लढायचंच, या सकारात्मक विचारांवर पती-पत्नीने जगाला बघण्यासाठी दृष्टी नसतानाही मसाज सेवेतून आजारी रुग्णांसाठी आधार बनत जगासमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवत संधीचं सोनं केलं ते नाशिकच्या मखमलाबाद येथील कविताताई अनिल पिंगळे... (nashik Inspirational Story Kavitha pingle news)

मराठवाड्यातील यवतमाळ जिल्ह्यातील माहेर असलेल्या कविताताई यांचे वडील गणेश चंद्रभान राठोड हे गावाकडे मजुरी करत कुटुंबाला हातभार लावत होते. पत्नी कमलबाई यांच्यासह दोन मुले व मुलगी कविता यांच्यासह कुटुंबासाठी धडपड सुरू होती. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे लवकरच गाव सोडण्याशिवाय पर्याय नव्हता.

कुटुंबाने गाव सोडल्यानंतर काही दिवस पंजाबमध्ये रोजगारासाठी स्थलांतर केले. मात्र जम न बसल्याने पुन्हा गावी न जाता जळगावमध्ये रोजगारासाठी प्रयत्न केले. याच काळात झालेल्या आघाताने कविताताई यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंतच झाले. कविताताई अभ्यासात हुशार होत्या; मात्र वयाच्या अकराव्या वर्षी त्यांना फिटचे झटके येत असल्याने कुटुंबाने त्यांना नाशिकला शासकीय रुग्णालयात दाखल केले.

याच काळात नाशिकच्या वडाळा भागातील एका कुटुंबाने आश्रय दिल्याने बिगारी काम करत वडील गणेश यांनी कुटुंबासाठी दोन घास पुरेसे मिळण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. याच काळात कविताताई यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोबत कोणी नसल्याने सात वर्षांचा लहान भाऊ संजय हा सोबत होता. या आजारावर उपचार सुरू असतानाच अधूनमधून कविताताई यांना कमी दिसत असल्याचे जाणवत होते. आजारामुळे अतिशय क्षीण झालेल्या कविताताई यांच्या शरीरात त्राण नसल्याने डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले.

शवागारात कविताताई यांना ठेवल्यानंतर काही तासानंतर त्यांच्या पायांची हालचाल सुरू झाल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. उपचारांतून त्या बाहेर पडल्या; मात्र यादरम्यान त्यांना कायमचे अंधत्व नशिबी आले. वडाळा नाका येथून परिवाराने पंचवटीतील नाग चौक परिसरात भाड्याने रूम घेतली.

Kavitatai Anil Pingle
Inspirational Stories : शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी, कृषी शाखेतून पदवी शिक्षण

सातपूरच्या अंधशाळेने दिला आधार

एका कुटुंबाच्या मदतीने कविताताई यांनी सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या अंधशाळेत प्रवेश घेतला. या ठिकाणी असलेल्या वर्कशॉपमध्ये तांत्रिक शिक्षण घेत असतानाच अनिल पिंगळे यांच्याशी ओळख झाली. अनिल यांचे शिक्षण अर्थशास्त्र विभागात पदवीपर्यंत झालेले होते.

दिव्यांग अनिल आणि कविताताई यांच्या निर्णयाला कुटुंबाने बळ दिल्याने दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सूर्यभान साळुंके यांच्यासह अंधशाळेच्या व्यवस्थापनाने दिलेल्या प्रोत्साहनामुळे दोघांनी डॉ. शिंपी यांच्या नॅचरोपॅथी महाविद्यालयातून मसाज सेवेची पदवी घेत स्वबळावर उभे राहण्याचा निर्णय घेतला.

नव्या व्यवस्थेला सुरवात

विवाहानंतर २००३ मध्ये दोघांनी सातपूर येथील वर्कशॉप सोडले. प्रारंभी मखमलाबाद परिसरात मसाज सेवा सुरू केल्यानंतर दिवसाकाठी साठ रुपये कमाई झाली. पब्लिक ट्रान्स्पोर्टचा उपयोग करत कुटुंबाने होम सर्व्हिस देत मसाज सेवेच्या माध्यमातून समाजाची गरज असलेल्या या सेवेतून अनेक रुग्णांसाठी आधार बनले. मसाज सेवेनिमित्ताने आजवर दोन लाखांच्या वर महिला-पुरुषांसाठी त्यांच्या आजारपणात मोलाचा आधार देतानाच या माध्यमातून आर्थिक घडी भक्कम करण्यासाठी त्यांना मोठी मदत झाली. (Latest Marathi News)

Kavitatai Anil Pingle
Inspirational Story : अखेर ज्ञानेश्‍वरची ‘पीएसआय’मध्ये बाजी; 12 वर्षांत 30 मुख्य परीक्षांमध्ये अपयश, तरी सोडली नाही उमेद

शहरात उभी केली ओळख

नाशिक शहर आणि परिसरात कविताताई आणि अनिल पिंगळे यांनी मसाज सेवेच्या माध्यमातून घरपोच सेवा देतानाच स्वतःची ओळख उभी केली आहे. सिटी बस किंवा रिक्षाद्वारे अनेक कुटुंबांना त्या ही सेवा देत आहेत. दोघेही अंध असताना कोणताही अंधत्वाचा बाऊ न करता स्वतःच्या मेहनतीला भक्कम करतानाच समोर अनेक संधी असूनही त्याचा उपयोग करून न घेणाऱ्यांसाठी आदर्श ठरले आहेत.

आयुष्यातील नकारत्मक बाजूंकडे दुर्लक्ष करत आपल्याकडे आहे त्याचा उपयोग करायला शिका, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. आयुष्याच्या वाटचालीत अंधत्वावर मात करतानाच आबा पिंगळे, जिजाबाई पिंगळे, गोकुळ पिंगळे, रूपाली पिंगळे, संजय राठोड, मंगला पिंगळे, पती अनिल यांच्यासह मैत्रीण कविता अहिरे, तसेच पिंगळे व राठोड परिवाराने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच स्वतःला सिद्ध करू शकली, हे कविताताई अभिमानाने सांगतात.

Kavitatai Anil Pingle
Inspirational Story : उंची तीन फूट... मात्र कर्तृत्व आभाळाएवढं...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com