Inspirational Story : अखेर ज्ञानेश्‍वरची ‘पीएसआय’मध्ये बाजी; 12 वर्षांत 30 मुख्य परीक्षांमध्ये अपयश, तरी सोडली नाही उमेद

Inspirational Story : ३० मुख्य परीक्षांमध्ये आलेले अपयश अन्‌ घरची परिस्थिती हलाखीची असतानाही उमेद न सोडता, अखेर त्‍याने ध्येय गाठलेच.
Friends celebrating the success of Dyaneshwar Ghotekar after getting promoted to the post of Sub-Inspector of Police.
Friends celebrating the success of Dyaneshwar Ghotekar after getting promoted to the post of Sub-Inspector of Police.esakal

Inspirational Story : थोडे थोडके नव्‍हे, तर एक तप म्‍हणजे सुमारे बारा वर्षे अभ्यासात सातत्‍य ठेवत तब्‍बल ३० मुख्य परीक्षांमध्ये आलेले अपयश अन्‌ घरची परिस्थिती हलाखीची असतानाही उमेद न सोडता, अखेर त्‍याने ध्येय गाठलेच. खेडलेझुंगे (ता. निफाड) येथील ज्ञानेश्‍वर घोटेकर याने नुकतेच स्‍पर्धा परीक्षेत यश मिळविले असून, त्‍याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. स्‍पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी त्‍याचा प्रवास निश्‍चित प्रेरणादायी असाच आहे. (nashik Inspirational Story of Dnyaneshwar wins in PSI exam )

कौटुंबिक परिस्थिती बेताची असलेल्‍या ज्ञानेश्‍वर घोटेकर याने इतर सामान्‍य विद्यार्थ्यांप्रमाणे बी. टेक.चे (कृषी) शिक्षण पूर्ण केले. २०१२ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षा देण्यास त्याने सुरवात केली. यादरम्‍यान २०१३ मध्ये कंत्राटी तांत्रिक अधिकारी म्हणून ‘मनरेगा’ची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. थोडी आर्थिक चणचण कमी होईल, या दृष्टिकोनातून त्याने या पदासाठी काम सुरू केले. परंतु ध्येय मोठे असल्याने या पदावर त्‍याचे मन काही रमत नव्हते.

अवघ्या तीन महिन्यांतच नोकरीला रामराम ठोकून तो पुन्हा अभ्यासाकडे वळाला. सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर पूर्वपरीक्षेची लक्ष्मणरेषा ज्ञानेश्वरने तेव्हाच पार केली होती. परंतु खरी कसोटी मुख्य परीक्षा व त्‍यापुढील चाचण्यांमध्ये यश मिळवायची होती. पण कुठलेही यश व्यक्तीला तावून सुलाखून निघाल्याशिवाय मिळत नाही. तसेच ज्ञानेश्वरच्या बाबतही झाले.  (latest marathi news)

Friends celebrating the success of Dyaneshwar Ghotekar after getting promoted to the post of Sub-Inspector of Police.
Inspirational Story : अंधत्वावर मात करीत मिळविली रेल्वेत नोकरी

दिवस सरत गेले अन्‌ ज्ञानेश्‍वर परीक्षा देत गेला. बघता-बघता ‘एमपीएससी’च्‍या तब्बल ३० मुख्य परीक्षा त्‍याने दिल्या. घरची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असल्‍याने त्‍याच्‍यावर जबाबदारी सांभाळण्याचेही आव्‍हान होते. कौटुंबिक, सामाजिक समीकरण बदलत चालले होते. परंतु या परिस्थितीतही कुटुंब आणि काही मित्रांनी मोलाची साथ दिली. त्यांच्या पाठिंब्यावर ज्ञानेश्वरने अखेर पोलिस उपनिरीक्षकपदाचा पल्ला गाठला.

एक-दोन गुणांनी हुकायची संधी, तरी ‘तो लढला अन्‌ जिंकलाही’

बारा वर्षांत ३० पेक्षाही जास्‍त मुख्य परीक्षा दिलेला ज्ञानेश्‍वर यशापासून अवघे एक पाऊल लांब असताना, त्‍याला अपयश येत होते. या एका तपाच्‍या कालावधीत पुस्तके कोळून पिलेल्‍या ज्ञानेश्‍वरला दर वर्षी किरकोळ गुणांच्‍या कमतरतेमुळे अपयशाला सामोरे जावे लागत होते. तीन वर्षांपासून तर एक किंवा दोन गुणांनी त्‍याची निवड हुकत होती.

कधी, कधी शारीरिक त्रासांनी यश त्याच्यापासून दूर जात होते. बरोबरचे मित्र नोकरीत स्थिरावले. काही संसारालाही लागले. मात्र त्याने त्याचा विचार न करता प्रयत्‍न सुरूच ठेवले. घरची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असतानाही, त्‍याने जिद्द सोडली नाही. अखेर तो ‘तो लढला अन्‌ जिंकला.’

Friends celebrating the success of Dyaneshwar Ghotekar after getting promoted to the post of Sub-Inspector of Police.
Inspirational Story: तिने कॉर्पोरेट जॉबला लाथ मारली अन् 24 व्या वर्षी UPSC मध्ये मिळवली 18 वी रँक; वाचा प्रेरणादायी स्टोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com