
नाशिक : स्वप्नांच्या दिशेने चालत स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक जणी धडपडत असतात. अडचणींवर प्रयत्नांतून मात करता येते, या सकारात्मक विचारांतून त्या एकत्र आल्या. शेतकरी परिवाराच्या घटक असल्याने स्वतःचे योगदान तितकेच मोलाचे, या जिद्दीने काम करीत केलेल्या कार्याचे फळ नक्कीच जग बदलणारे ठरेल, हा आत्मविश्वास होता. स्वतःशी प्रामाणिक राहत द्राक्ष बागायतदार शेतकरी महिलांची चळवळ उभी करणाऱ्या ग्रामसमृद्धी महिला द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षा प्रतिमा वसंतराव मोरे यांचा प्रवास महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.