नाशिक, जळगावात नीडल फ्री लसीकरण | Corona

Corona Vaccination
Corona Vaccinationsakal
Updated on

नाशिक : लसीकरणात नाशिकचा टक्का राज्यात नीचांकी पातळीवर आल्याने राज्याच्या वैद्यकीय विभागाने नीडल फ्री लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नाशिक व जळगावची निवड करण्यात आली. झायकोव-डी नीडल फ्री लसीकरणाकडे पायलट प्रोजेक्ट म्हणून बघितले जात असून, यश आल्यास राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हा प्रोजेक्ट राबविला जाणार आहे.

नाशिक जिल्ह्यात १२ लाख नागरिक पहिल्या डोसपासून, तर ३३ लाख लोक असे आहेत की त्यांनी एकाही लशीचा डोस घेतलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकारने इंजेक्शनविरहित (नीडल फ्री) लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील जळगावची निवड करण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर तिसऱ्या लाटेची तयारी महापालिकेने केली. त्यात दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉनने नवे संकट उभे केले. पाच ते सातपट वेगाने पसरणाऱ्या या व्हेरिएंटमुळे लसीकरणाला गती आली आहे. नाशिकच्या शहर व ग्रामीण मिळून ५१ लाख ७५ हजार ८८९ लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. आतापर्यंत ३९ लाख ४७ हजार ४४ नागरिकांनी पहिला डोस घेतला, तर १८ लाख ४८ हजार ८५२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. पहिला डोस घेणारे ७६ टक्के, तर दुसरा डोस घेणारे ३६ टक्के आहेत. नाशिक जिल्हा लसीकरणात नीचांकी पातळीवर असल्याने लसीकरण कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारने नीडल फ्री लसीकरणाचा निर्णय घेतला असून, त्यात नाशिकचा समावेश करण्यात आला आहे. हैदराबाद येथील कॅडिला हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत देशी झायकोव-डी नीडल फ्री लस शहरी व ग्रामीण भागात दिली जाणार आहे. यंत्राच्या सहाय्याने स्किनमधून लस दिली जाईल. २८ दिवसांच्या अंतराने तीन डोस दिले जाणार आहेत.

Corona Vaccination
लग्नात नवरीचे पाहुण्यांना भन्नाट गिफ्ट, मित्रपरिवारांनी ठोकला सलाम!

नाशिकसह जळगावचा समावेश

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व जळगाव या दोन जिल्ह्यांत नीडल फ्री व्हॅक्सिनेशन केले जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून १६ लाख डोस मिळणार असून, दोन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी आठ लाख डोसचे वाटप केले जाणार आहे.

''नीडल फ्री झायकोव-डी लसीकरणासाठी नाशिक व जळगावची निवड करण्यात आली आहे. लस प्राप्त झाल्यानंतर लसीकरण सुरू होईल.'' - डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका

Corona Vaccination
CDS Bipin Rawat Death: हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपिन रावत यांचे निधन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com