नाशिक: गुजरातमधून नाशिकमध्ये यायचे आणि पादचारी महिला हेरून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून परत गुजरातमध्ये पलायन करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात यश आले. इंदिरानगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करीत अटक केली असून, त्यांनीच गेल्या आठवड्यात उपनगरला महिलेची सोनसाखळी ओरबाडल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, संशयितांनी महाराष्ट्रासह कर्नाटक व गुजरातमध्येही जबरी चोऱ्या केल्या असून, १८ गुन्ह्यांची उकल झाली आहे.