Nashik Tribal Development : निविदा तक्रारी शासनाच्या कोर्टात! आदिवासी विभागाने मागविले मार्गदर्शन

Nashik News : लेखन साहित्य व प्रयोगशाळा साहित्य खरेदी करण्याच्या ४२.५४ कोटींच्या निविदेविरोधात केंद्रीय भांडार या ग्राहक सहकारी संस्थेने आदिवासी विकास विभागाकडे तक्रार केली आहे.
tribal development department
tribal development departmentesakal

Nashik News : आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ व २०२५-२६ या दोन शैक्षणिक वर्षांसाठी वह्या, लेखन साहित्य व प्रयोगशाळा साहित्य खरेदी करण्याच्या ४२.५४ कोटींच्या निविदेविरोधात केंद्रीय भांडार या ग्राहक सहकारी संस्थेने आदिवासी विकास विभागाकडे तक्रार केली आहे. (Kendriya Bhandar consumer cooperative society lodged complaint with tribal development department )

या तक्रारींची दखल घेत विभागाने याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविले. दरम्यान, हा पुरवठादारांमधील जुना वाद असल्याची चर्चा विभागात सुरू आहे. राज्यातील ४९८ आश्रमशाळांमधील पहिली ते बारावीच्या एक लाख ९९ हजार ३७२ विद्यार्थ्यांना गणवेश, पेटी, बूट, नाईट ड्रेस, वह्या, लेखनसाहित्य आदी साहित्य पुरविण्यासाठी निविदा प्रसिद्ध केलेली आहे.

त्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या, प्रात्यक्षिक वह्या आदींसाठी ३० कोटी रुपयांचे व पेन्सिल, खोडरबर, पेन, पॅड, कंपासपेटी आदींचे किट पुरविण्यासाठी १२.५४ कोटी रुपयांची स्वतंत्र निविदा प्रसिद्ध केली आहे. यात सात निविदा प्राप्त झाल्या होत्या. यातील तीन पुरवठादारांच्या निविदा विविध कारणांनी रद्द ठरविण्यात आल्या आहेत. चार पुरवठादारांच्या निविदा स्वीकारण्यात आल्या.

निविदांसाठीच्या झालेल्या प्रीबिड बैठकीत काही पुरवठादारांनी आक्षेप नोंदविले होते. मात्र, आदिवासी विभागाने या अटी-शर्तींमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नसल्याचे निविदेच्या पुरवणीपत्रात स्पष्ट केले आहे. निविदा प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या केंद्रीय भांडार या ग्राहक सहकारी संस्थेने अपात्रतेच्या कारणांची मागणी करीत. (latest marathi news)

tribal development department
Nashik News : पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रासह अन्य राज्यांवर अन्याय!

पात्र ठरलेल्या निविदाधारकांची कागदपत्रांची मागणी केलेली आहे. सदर पत्राच्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागाने कागदपत्रे द्यावीत की नाहीत, यासंदर्भात शासनस्तरावर मार्गदर्शन मागविले आहे. मार्गदर्शन प्राप्त झाल्यावर, तक्रारदार पुरवठादारास लेखी कळविण्याची भूमिका विभागाने घेतली आहे.

"लेखन साहित्य निविदा प्रक्रियेत अपात्र ठरविलेल्या पुरवठादाराने अपात्रतेची कारणे तसेच पात्र ठरलेल्या निविदाधारकांच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. त्याबाबत शासनाकडून योग्य ते मार्गदर्शन मिळाल्यावर त्यांना देण्यात येईल. या विरोधात पुरवठादारांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने मागे घेण्यास लावलेली आहे. शासनाच्या आदेशानुसार, ही प्रक्रिया राबविली जात आहे." - नयना गुंडे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य

tribal development department
Nashik Onion News : मनमाड बाजार समितीत 35 दिवसानंतर लिलाव! कांद्याला सरासरी पंधराशेचा भाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com