Kumbh Mela
sakal
नाशिक
Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामे दर्जेदारच हवीत! गुणवत्ता आणि पारदर्शकतेबाबत मुख्यमंत्र्यांच्या सक्त सूचना
Infrastructure and Road Development Updates : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. गुणवत्ता, पारदर्शकता आणि रिंगरोडच्या कामांना गती देण्याचे आदेश दिले.
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे पायाभूत सुविधांची सर्व कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत, सिंहस्थ कामांच्या निविदेत पारदर्शकता ठेवताना चांगल्या व प्रमाणित ठेकेदारांना कामे द्यावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नाशिकच्या नवीन रिंगरोडबाबत दिरंगाई खपवून घेणार नाही, असा सज्जड दम देताना साधुग्राम व टेंटसिटीसाठी भूसंपादन गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.