Nitesh Karale
sakal
नाशिक: कुंभमेळ्यासाठी होणारा २५ हजार कोटी रुपयांचा खर्च फालतू असल्याचे वक्तव्य ‘खदखद’फेम नीतेश कराळे ऊर्फ कराळे मास्तर यांनी केले आहे. हा खर्च गांजा फुंकणाऱ्या साधूंवर का केला जातो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत विश्व हिंदू परिषेदेने वर्धा येथे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.