Nashik News : लेव्हीप्रश्‍नी तोडगा न निघाल्यास 1 मेपासून तीव्र आंदोलन छेडणार! माथाडी कामगार युनियनचा इशारा

Nashik News : महिनाभरापासून जिल्ह्यातील बाजार समित्या लेव्हीच्या मुद्द्यावरून कुलूपबंद असल्याने कोट्यवधी रुपयांची दैनंदिन उलाढाल ठप्प झाली आहे
Strike
Strikeesakal

नामपूर : महिनाभरापासून जिल्ह्यातील बाजार समित्या लेव्हीच्या मुद्द्यावरून कुलूपबंद असल्याने कोट्यवधी रुपयांची दैनंदिन उलाढाल ठप्प झाली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी कांदा व्यापाऱ्यांनी खासगी मार्केट सुरू केल्याने कष्टकरी माथाडी कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

हाताला काम नसल्याने कुटुंबाची गुजराण कशी करायची, असा प्रश्‍न कामगारांना पडला आहे. याबाबत तोडगा न निघाल्यास कामगार दिनापासून (ता. १) बाजार समित्यांचे प्रवेशद्वार व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माथाडी कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. (Nashik levy issue not resolved intense agitation Mathadi Labor Union)

बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव महिनाभरापासून बंद आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी काही ठिकाणी कांदा व्यापाऱ्यांनी पुढाकार घेवून खासगी मार्केट सुरू केले आहेत. त्यामुळे सदर व्यापाऱ्यांकडे कामगार कायद्यान्वये कामाची मागणी करूनही व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कांदा व्यापारी कांदा खरेदी-विक्री प्रक्रियेत माथाडी कामगारांना सोयीस्कररित्या बाजूला सारल्यामुळे व्यापारी आणि माथाडी कामगारात संघर्षाची ठिणगी पडली आहे.

नाशिक जिल्हा माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायद्यानुसार खासगी मार्केट व व्यापाऱ्यांच्या आस्थापनेत माथाडी स्वरूपाच्या कामासाठी मंडळाची योजना लागू होते. त्यानुसार खासगी मार्केटच्या आवारात व व्यापाऱ्यांच्या खासगी जागेत माथाडी स्वरुपाची हमाली, तोलाई आदी कामे मंडळाच्या नोंदीत माथाडी कामगारांकडून करून घेणे माथाडी कायद्यान्वये बंधनकारक आहे. (Latest Marathi News)

Strike
Onion Export News : कांदा निर्यातबंदी केंद्राने उठवली पण भाव वाढ होणार का?

परंतु, जिल्ह्यातील खासगी मार्केटमध्ये मंडळाच्या नोंदीत माथाडी कामगारांव्यतिरिक्त इतरांकडून करून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी माथाडी युनियनने कामगार उपायुक्तांकडे केल्या आहेत.

"जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडे माथाडी कामगारांची सुमारे १३६ कोटी रुपयांची लेव्हीची रक्कम जमा करण्यासाठी संबंधित व्यापाऱ्यांना माथाडी बोर्डाने नोटिसा पाठविल्या आहेत. लेव्हीच्या वसुलीला बगल देण्यासाठी जिल्ह्यातील व्यापारी वर्गाने षडयंत्र रचले आहे. १ एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या हिशेब पावतीतून हमाली, तोलाई, वाराईची रक्कम कपात न करण्याचा निर्णय घेतल्याने माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कामगार हिताचा निर्णय घ्यावा."- हिंमत पगार, मापारी प्रमुख, नामपूर

Strike
Nashik Onion Export : निर्यात खुली केली हो, पण बाजार समित्यांचे काय? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com