नाशिक: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नाशिक विभागात तयारीला वेग आला आहे. यंदाच्या निवडणुकीत अतिरिक्त नऊ हजार ४७९ कंट्रोल युनिट, तसेच ३० हजार ९३० बॅलेट युनिटची गरज भासेल. महसूल प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे अतिरिक्त मशिन्सची मागणी नोंदविली आहे.