Nashik Lok Sabha Constituency : गोडसे कुटुंबीयांकडे 16 कोटींची संपत्ती; गेल्या 5 वर्षांत अचल संपत्तीत काहीशी घट

Lok Sabha Constituency : सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या नावे एकूण १६ कोटींची संपत्ती आहे.
Hemant Godse
Hemant Godseesakal

Nashik News : सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या नावे एकूण १६ कोटींची संपत्ती आहे. खासदार गोडसेंच्या नावे १३ कोटी ३८ लाखांची, तर पत्नी अनिता गोडसेंच्या नावावर दोन कोटी ८२ लाखांची संपत्ती असल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. (Nashik Lok Sabha Constituency)

विशेष म्हणजे खासदार गोडसेंवर साडेपाच कोटींचे, तर पत्नीच्या नावे एक कोटी पाच लाखांचे कर्ज असल्याचे दिसून येते. गेल्या पाच वर्षांत खासदारांच्या संपत्तीत वाढ होण्याऐवजी अचल संपत्तीत सव्वासहा कोटींवरून सव्वापाच कोटींपर्यंत घसरण झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. खासदार गोडसे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर २०१९ मध्ये साधारणत: साडेसहा कोटींची संपत्ती होती.

अचल संपत्तीत रेणुका बिल्डकॉन, गुरू एंटरप्रायझेस, जय मातादी एंटरप्रायझेस, मातोश्री एंटरप्रायझेस याप्रमाणे विविध संस्थांमध्ये त्यांचे समभाग आहेत. गोडसे यांना स्वमालकीची व वडिलोपार्जित शेतजमीन असून, देवळाली कॅम्पला कार्यालय आहे. संसरी व लॅम रोडला घर, सदनिका आहेत. २०२४ पर्यंत या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते.

सद्यस्थितीला त्यांच्याकडे पाच लाख सात हजारांची रोख रक्कम आहे. त्यांची चल संपत्ती आठ कोटी आठ लाखांची असून, अचल संपत्ती पाच कोटी ३० लाखांवर आहे. पाच लाख ५६ हजार रुपयांचे कर्जही गोडसेंनी घेतले आहे. पत्नीच्या नावे दोन कोटी २९ लाखांची चल संपत्ती, तर ५३ लाख २१ हजारांची अचल संपत्ती आहे. (Latest Marathi News)

Hemant Godse
Nashik Loksabha: नाशिकवरून वरिष्ठ नेत्यात वाक्‌युध्द; NCPचे पटेल म्हणतात, नाशिक आमचेच! सेनेचे शिरसाठ म्हणतात, आग्रह नव्हे, हट्ट!

आपल्यावर एक कोटी पाच लाखांचे कर्ज असल्याचे गोडसेंनी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे; तर विविध बँकांमध्ये ठेवी, बचत खात्यात रक्कम, सोने, शेअर यातही चांगली गुंतवणूक असल्याचे दिसून येते.

त्यांच्या स्नुषा भक्ती अजिंक्य गोडसे यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्याने त्यांच्या नावावरील संपत्तीही समोर आली आहे. भक्ती यांच्या नावे १९ लाख ७३ हजारांची चल संपत्ती, तर पती अजिंक्य गोडसे यांच्या नावावर दोन कोटी नऊ लाख रुपयांची चल संपत्ती असल्याचे दिसून येते. अचल अर्थात स्थावर मालमत्ता त्यांच्या नावावर नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

गायकरांकडे लाखाची रोकड

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांच्याकडे एक लाख रुपयांची रोख रक्कम असून, २४ लाख ३५ हजारांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ३२ लाख १० हजारांची स्थावर मालमत्ता दिसत असली, तरी जवळपास २१ लाखांची वडिलोपर्जित संपत्ती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Hemant Godse
Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

निवृत्ती अरिंगळे कोट्यवधीचे धनी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून इच्छुक असलेले निवृत्ती अरिंगळे यांच्या नावे कोट्यवधींची संपत्ती आहे. एक लाख २० हजार रुपये रोख रक्कम असलेल्या अरिंगळेंकडे दहा हजारांच्या ठेवी व १६ लाखांची गाडी असून, सहा लाखांचे शंभर ग्रॅम सोने त्यांच्याकडे आहे.

अशी साधारणत: एक कोटी ४२ लाखांची चल संपत्ती, तर चार कोटी ३२ लाखांची अचल संपत्ती त्यांच्या नावावर आहे. त्यातील पावणेचार कोटींची संपत्ती वडिलोपार्जित असून, ६० लाखांची संपत्ती त्यांनी स्वत: खरेदी केली. विशेष म्हणजे १२ लाख रुपयांचे कर्जही त्यांच्या नावे असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Hemant Godse
Nashik Loksabha: शिंदे यांच्या आग्रहामुळे भुजबळांनी केली तलवार म्यान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com