Nashik Lok Sabha Constituency : महायुतीचे शक्तिप्रदर्शन

Lok Sabha Constituency : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवारांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
Grand Alliance Rally
Grand Alliance Rally esakal

Nashik News : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवारांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या डॉ. भारती पवार या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल झाले. (Nashik Lok Sabha Constituency)

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून उमेदवार घोषित करण्यास विलंब झाला. महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधून हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. त्यापूर्वी भाजपच्या डॉ. भारती पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

महायुतीकडून दोन्ही उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शक्ती प्रदर्शनाद्वारे उमेदवारी अर्ज भरण्याची निश्चित करण्यात आले. गुरुवारी (ता. २) पक्षाचा ए व बी फॉर्म प्राप्त झाल्यानंतर गोडसे यांचे इगतपुरी येथील घाटनदेवी मंदिराजवळ स्वागत करण्यात आले. तेथून पुढे चार चाकी रॅलीद्वारे गोडसे नाशिक शहरात दाखल झाले. त्यापूर्वी भालेकर मैदान येथे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमले.

तेथून संयुक्त रॅली काढण्यात आली. रॅलीनिमित्त रथ तयार करण्यात आला. त्यावर दोन्ही उमेदवारांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे नेते अभिजित पानसे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासह पंतप्रधान यांचा जय घोष रॅली द्वारे करण्यात आला. भालेकर मैदान येथून रॅलीला सुरुवात झाली. (Latest marathi news)

Grand Alliance Rally
Nashik Loksabha Constituency: नाशिक मतदारसंघातील स्पर्धेतून मनसेची माघार? गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

खडकाळी सिग्नल शालिमार चौक नेहरू उद्यान मार्गे महात्मा गांधी रोड व पुढे मेहर सिग्नल पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे थेट वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय पोहोचले. महायुतीच्या घटक पक्षातील शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.

फडणवीस माघारी फिरले

शक्तिप्रदर्शनासाठी रथ तयार करण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह उमेदवार मतदारांना अभिवादन करणार होते. परंतू शिवसेनेच्या उमेदवारांसह रॅली उशिराने पोहोचली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील कल्याण येथून येण्यास उशीर झाला.

त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. प्रचार रथावर खडकाळी सिग्नलपर्यंत ते होते. पुढे कोल्हापूर येथे प्रचार सभा असल्याने तेथूनचं ते माघारी फिरले. फडणवीस यांच्यानंतर श्री. भुजबळ हे देखील रथावरून उतरले. मुख्यमंत्री शिंदे हे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ व देवळालीच्या आमदार सरोज अहिरे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.

Grand Alliance Rally
Nashik Loksabha: शिंदे यांच्या आग्रहामुळे भुजबळांनी केली तलवार म्यान

कोकाटेंच्या गैरहजेरीने नाराजीचा सुर

नाशिकमधून इच्छुक असलेले सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे प्रचार रॅलीत सहभागी न झाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. समन्वय समितीच्या बैठकीकडेही त्यांनी पाठ फिरविली.

त्यापाठोपाठ शक्ती प्रदर्शनात रॅलीत सहभागी न झाल्याने त्यांची नाराजी कायम असल्याची चर्चा होती. लग्न कार्य मोठ्या प्रमाणातअसल्याने सहभागी होता आले नसल्याचे त्यांनी सकाळ प्रतिनिधीकडे सांगितले.

Grand Alliance Rally
Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com